ईतर

वाहतूक शाखेचा अजब कारभार चव्हाट्यावर! मार्च एन्ड टार्गेट पूर्ण करण्याच्या नादात;न केलेल्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनाची शिक्षा!

पुसद :मार्च एन्ड काही दिवसांपासून वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम सुरु केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. रस्त्यावरील चौकाचौकांत वाहतूक पोलिसांच्या टोळ्या मार्च एन्डमुळे सक्रिय झाल्या आहेत. चौकाचौकात दुचाकी, चारचाकी वाहनांना अडवून लुटण्याचे काम सुरू आहे. टार्गेट पूर्ण करण्यासाठी वसुलीसाठी सक्रिय झालेले वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई एवढी तत्परता वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून कधी दाखवताना दिसत नाहीत किंवा अवैध वाहतूक रोखण्यासाठी सुद्धा प्रयत्न करताना दिसत नाहीत पण तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्थेसह वाहतूक व्यवस्था बिघडत चालली आहे.रस्त्यावर वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे,चौकातील वाहतूक नियोजनात नसणारे वाहतूक पोलीस पावत्यांसाठी चौकाचौकात लुटारू टोळक्या सारखे थांबून वाहने अडवत आहेत. असाच वाहतूक शाखेचा आजब कारभार चव्हाट्यावर आला आहे वाहतूक शाखेच्या चुकीच्या कारभाराचा फटका सर्वसामान्य दुचाकीस्वराला बसलाय आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की,पुसद येथील दुचाकीवाहन चालक आनंद हेडा यांच्या मोबाईलवर १९ मार्च रोजी सायंकाळी ६:४ मिनिटांनी वाहतूक शाखेची एक चलान आली तिचा क्रमांक वायएटीसीएम २५००२९२०२५६असुन वाहतूक शिपायाचे नांव प्रेमलता वानखेडे अशी आहे दुचाकी चालक यांच्या नावासह १००० रुपये भरण्यासाठी कागदपत्रासह यवतमाळ येथे येण्याची ती नोटीस आहे परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस दुचाकीची चलन झाली त्यावेळेस दुचाकीस्वार आनंद हेडा आहे पुसद मध्येच पुसद शहरातच होते परंतु ही घटना यवतमाळ शहरातील आहे. यवतमाळ शहरात एक्टिवा दुचाकी स्वार दुचाकीने मोबाईलवर बोलत असताना त्याची दुचाकी चलान केली परंतु हेडा हे त्याच वेळी पुसद येथे होते परंतु त्यांच्याजवळी प्लसर या दुचाकीचा क्रमांक टाकण्यात आला त्यामुळे याचे छायाचित्रही पाठविले जाते. प्रत्यक्षात त्या छायाचित्रातील व्यक्ती व दुचाकी सुद्धा आनंद हेडा नसून वाहन क्रमांक यांच्या गाडीचा टाकण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन केले नसतानाही नागरिकांना दंडाचे चलन व नोटीस बजावले आहे. त्यामुळे वाहतूक शाखेच्या चुकीच्या कारभाराचा फटका चव्हाट्यावर आला असून याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. नियमभंग करणारी ‘ती’ व्यक्ती आपण नाही, हे सिद्ध करताना नागरिकांची दमछाक होत आहे. परंतु हे वाहतूक शाखेतील शिपाईची मार्च एन्ड च्या नावाखाली पठाणी वसुली सुरू असून याचा फटका वाहतूक नियमाचे उल्लंघन नकरणाऱ्या व्यक्तींना बसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close