क्राइम

पुसद नदीच्या पुलावर भीषण अपघात! दोघांचा मृत्यू शहर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना!

पुसद: शहरातील पुस नदीवर गेल्या दोनतीन वर्षांपासून सुरू असलेल्या नवीन पुलाचे काम सुरू होते मात्र दोन दिवसापासून हा पुल रहदारीस मोकळा करण्यात आला असून आज सकाळी २१:३०वाजन्याच्या सुमारास भिषण दुर्घटना घडली असून सोळा चाकी ट्रकच्या मागिल चाकात दुचाकीस्वारांचे वाहन आल्याने या भीषण अपघातात एकाचा जागेवरच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना रस्त्यांतच मृत्यू झाला आहे.हा अपघात इतका भीषण होता की,युसुफ शहा चांद शहा वय अं.५५वर्ष रा.वसंत नगर पुसद व यादव काळुराम टारफे वय अं. २८वर्ष रा.निंगणुर ता.उमरखेड जि.यवतमाळ अशी मयताची नावे आहेत हे दोघे ट्रकच्या चाकाखाली सापडले. एकाच्या डोक्यावरुन ट्रकचे चाक गेल्याने त्यांच्या मेंदूंचा चेंदामेंदा झाला. पुलावरील रस्त्यावर रक्ताचा सडा सांडला होता.

या भीषण अपघाताविषयी प्राप्त माहिती अशी की, युसुफ शहा आणि यादव टारफे हे आज सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास ईटावाकडुन शहरातकडेस्कुटी क्रं.एमएच २९ए५१३२या दुचाकीने जात असताना समोर जाणाऱ्या सोळा चाकी ट्रक क्रमांक -एमएच टि०८१८या वाहनांच्या मागील चाकात आल्याने यांच्या अंगावरुन ट्रकचे चाक गेले आणि रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात एकाच्या डोक्यावरुन ट्रकचे चाक गेल्याने त्यांच्या मेंदूंचा चेंदामेंदा झाला.बेशुद्धावस्थेत पडला पुलावरील रस्त्यावर रक्ताचा सडा सांडला होता याघटनेनंतर ट्रकचालक ट्रक सोडून पळून गेला.त्यावेळी प्रत्यक्षदर्शीनी या घटनेची माहिती पोलीस आणि रुग्णवाहिकेला कळविली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत मयताच्या नातेवाईकही तेथे आले होते.एका अपघातग्रस्तला तात्काळ पुढील उपचारासाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला या दोघांना यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. या दुर्घटनेच्या भिषण अपघातांची माहिती शहर पोलीसांना मिळताच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजेंद्र क्षिरसागर यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा वाहतूक शाखेचे अनिल कांबळे यांच्यासह वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी पुलावरील अपघातग्रस्त वाहने व बघ्यांची गर्दी तात्काळ हाटवुन वाहतूक सुरळीत केली या अपघाताचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close