मोठी बातमी!भरदिवसा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर अज्ञातांकडुन जिवघेणा चाकू हल्ला आरोपी पसार; वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना!

पुसद : वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातील शिपाई पदावर कार्यरत असलेले कर्मचाऱ्यावर आज शनिवार सकाळी ११:०० ते१२:०० वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी जिवघेणा चाकू हल्ला करून गंभीर जखमी केले. भरदीवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पुसद वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात शिपाई पदावर कार्यरत असलेले वाघजी सुखदेव बोंबले (वय ३७) या कर्मचाऱ्यावर आज शनिवार सकाळच्या ११:००ते १२:०० वाजण्याच्या सुमारास कार्यालयात हजर असताना त्यांना माहिती खबऱ्यांकडून गुप्त माहिती मीळाली की शाळे जवळील एका दुकानात दारूची विक्री केली जात आहे त्यावरून दुकानार व या कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला त्यावेळी आरोपीने जळचा धारदार चाकू काढून या शिपायावर जिवघेणा हल्ला चढविला व आरोपी पसार झाला या हल्ल्यात हे कर्मचारी गंभीर जख्मी असुन प्राथमिक उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले होते परंतु या कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले.या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच वसंतनगर पोलीस स्टेशनच्या परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूजा राठोड, पोलीस कर्मचारी तसेच आरसीपी पथक घटनास्थळी धाव घेतली पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आल्याची सुत्रांची माहिती आहे.विशेष म्हणजे पुसद पोलीस उपविभागातील सर्वंच पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे बोकळले असतात तेव्हा एखाद्या परिसरात अवैध गावठी, देशी दारू विक्री, जुगार, गुटखा,अंमली पदार्थांची तस्करी, मटका यांसारखे बेकायदेशीर व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढतात, तेव्हाच गुन्हेगारी वाढते परंतु या पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रारी करून सुद्धा तक्रारीची दखल घेतल्या जात नसल्याने अवैध धंदे या भागात बोकाळले आहेत त्यामुळे दिवसाढवळ्या अशा घटना घडत आहेत. परंतु शासकीय कार्यालयात दिवसाढवळ्या कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याने शहरातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून खळबळ उडाली आहे.



