राजकिय

तालुका काँग्रेसची आढावा बैठक संपन्न ; येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक करिता कार्यकत्यांनी सज्ज व्हावे : ऍड. जितेंद्र मोघे… 

पुसद :- रेस्ट हाऊस पुसद येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आढावा बैठक नुकतीच उत्साहात संपन्न झाली. या बैठकीमध्ये पक्ष संघटना मजबूत करणे,आगामी निवडणूका, आगामी काळातील पक्षाचे कार्यक्रम तसेच कार्यकर्त्यांच्या अडचणी व स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस विधानसभा निरीक्षक तथा जिल्हा उपाध्यक्ष अॅड. जितेंद्र भाऊ मोघे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सहनिरीक्षक जिल्हा महासचिव ख्वाजा भाई कुरेशी तसेच जिल्हा सचिव बाळासाहेब चेंद्रे,अरुण नरवाडे युवक अध्यक्ष ढाणकी,इम्रान खान नगर सेवक ढाणकी उपस्थित होते.

यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील संघटनात्मक परिस्थितीचा आढावा सादर केला. पक्षाची विचारधारा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून काँग्रेस संघटना अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.

बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष ऍड. वासिम अहेमद तालुकाअध्यक्ष ज्ञानदीप कांबळे, शहरअध्यक्ष झिया शेख,युवक जिल्हा महासचिव सुजित मानकामे, विधानसभा अध्यक्ष अभिलाष खैरमोडे दलित आघाडी शहर अध्यक्ष ऍड. पद्माकर विघ्ने, तहेसीन खान, महिला शहरअध्यक्ष योगिता नेमायते,सय्यद जानी,नगरसेवक प्र. गाझी खान, फिरोज खान, इर्शाद कुरेशी, युवाअध्यक्ष डॉ. मोहसीन, अल्प. युवा अध्यक्ष सोहेल चव्हाण,अल्ताफ खान, सलीम सरताज,रहेमान चव्हाण,पाशा खान, माहेफुज खान तालुका व शहर काँग्रेसचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close