पुसद शहरात जिल्हा वाहतूक शाखेकडून हेल्मेट न घालणाऱ्या १५ पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई;एकुन ३६ हजार२०० रुपयांचा दंडही वसुल!

पुसद : येथे हेल्मेट घालून वाहन चालवण्याची सक्ती करण्यात आली असताना पुसदकर मात्र त्याचा विरोधच करत असल्याचे दिसून येते. हेल्मेट न घालून वाहन चालविणाऱ्या सामान्य नागरिकांवर कारवाई केल्यास पोलीस कर्मचाऱ्यांना मात्र सवलत आहे काय, असा प्रश्न उपस्थित केला जातो. परंतु पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून १५ पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून प्रत्येकी १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला असून कायद्यापुढे सर्व सारखेच असल्याचा प्रत्यय येथील जिल्हा वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी दाखवून दिल्याने त्यांचे परिसरात कौतुक केले जात आहे.
याबाबत वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पुसद शहरात वाहन चालविताना हेल्मेट घालण्याची सक्ती १ ऑक्टोंबर २०२६ पासून विशेष वाहतूक मोहीम सप्ताह राबविण्यात आला परंतु या सक्तीचा पुसरकर विरोध करू लागले. सामान्य नागरिकांवर कारवाई केली जात असताना तुमचे पोलीस कर्मचारी कायद्याचे उल्लंघन करताना दिसत नाहीत कां? असा प्रश्न उपस्थित केला जात असे. त्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयातील व शहर पोलीस स्टेशन, वसंत नगर पोलीस स्टेशन, येथील पोलिस कर्मचाऱ्यांनी हेल्मेट न घालून वाहन चालविणाऱ्या १५ पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून प्रत्येकी एक हजार रुपये प्रमाणे दंड आकारून १५हजार रुपये दंड वसूल करण्यात आला तसेच यापूर्वीचा वाहतूक दंड थकविलेल्या ऑटो रिक्षांवरही कारवाई करण्यात आली. अशा ऑटो चालकांकडून जुन्या थकीत दंडापोटी एकूण ३६ हजार २०० रुपयांची वसुली करण्यात आली.
रस्ते अपघात आणि अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने विशेष मोहीम सप्ताह हाती घेतला होता. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी हेल्मेटसक्तीबाबत कठोर पवित्रा घेतला आहे. या मोहिमेची सुरुवात स्वतः पोलिसांपासून विनाहेल्मेट फिरणाऱ्या १५ पोलिस कर्मचाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलिस विभागाच्या कार्यालयांमध्ये कठोर अंमलबजावणी केल्यानंतर सामान्य नागरिकांवर कारवाई सुरू होईल. असा इशाराच वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आला आहे.वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही सातत्याने अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे वाहतूक शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे यांनी स्पष्ट केले आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिनेश गावंडे, महिला पोलीस उपनिरीक्षक खंडाते, पोहेकॉ संजय मुळे, मारोती राठोड, पोशी शुभम गवई व हरिदास कराळे , किरण मोटे, यांच्या पथकाने केली आहे.



