पुसद येथे दीपावली मिलन व अन्नकुट उत्साहात संपन्न.१३०० राजस्थानी समाज बांधवांची उपस्थिती

पुसद : राजस्थान मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अग्रवाल मंगल कार्यालय येथे अन्नकुट व दिपावली मिलन हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सकाळी ९ वा.३० मी. पासुन लहान्यांनी वरिष्ठाचेआर्शिवाद घेतले. ११ वा. राधाकृष्ण मंदिरात पंडीत ओमप्रकाश तिवारी यांच्या मंञोच्चारात राजस्थान मंडळाचे अध्यक्ष विजय भांगडे यांचे हस्ते भगवान राधा-श्रीकृष्णाची विधिवत प्रतिमेचे पुजन व सामुहिक आरती करण्यात आले.
पुजेत छप्पन भोग ठेवण्यात आले होते. आरती नंतर अन्नकुट प्रसादला सुरवात करण्यात आली. दिवाळी निमित्य समाजातील प्रत्येकापर्यंत गोड जेवण पोहवण्याच्या उदिष्टाने अन्नकुटची परंपरा राजस्थान मंडल राजस्थानी समाजासाठी पार पाडत आहे.
पारंपारीक राजस्थानी व्यंजन अन्नकुट प्रसाद मध्ये देण्यात आले होते. ह्या कार्यक्रमासाठी समाजातील सर्वजण मदत करीत असतात. अन्नकूट स्थळी कोणताही पदार्थ व्यंजन वाया टाकु नये च्या सुचना देण्यात येत होत्या.जेणेकरून अन्न वाया जाणार नाही याची काळजी घेण्यात आली.
अन्नकुट व दिपावली मिलन कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजस्थान मंडळाचे अध्यक्ष विजय भांगडे समेत संपूर्ण राजस्थान मंडळ कार्यकारणीने अथक परिश्रम घेतले. तसेच कार्यक्रमात संपूर्ण राजस्थानी समाज, राजस्थानी महिला मंडळ,पुसद तालुका माहेश्वरी संघटन,अग्रवाल मंडळ, राजस्थानी ब्राम्हण पंचायत, जांगिड समाज, अ.भा.मारवाडी युवा मंच शाखा पुसदचे सहयोग मिळाले.




