राजकिय

मालिकार्जून खर्गे यांच्या सभेच्या मंचाचे शुद्धीकरण प्रकरणी पुसद काँग्रेस कमिटीकडून तिव्र निषेध:उत्तराखंडमधील घटनेवर संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी!

पुसद :काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील रामलीला मैदानावर झालेल्या सभेनंतर, काही धर्मांध शक्तींनी त्या मंचाचे शुद्धीकरण केले. या घटनेचा पुसद काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध केला असून, संबंधितावर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत संबंधित प्रशासनाला निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

देशातील प्रमुख राजकीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या मल्लिकार्जुन खर्गे यांच्याबाबत घडलेली ही घटना अत्यंत गंभीर असून, अशा प्रकारच्या घटना लोकशाहीच्या मूल्यांना बाधा आणणाऱ्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्यात यावी, तसेच घटनेला जबाबदार असलेल्या संबंधित व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.

लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक राजकीय नेत्याला सन्मानाने व सुरक्षित वातावरणात आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. राजकीय मतभेद असले तरी हिंसक किंवा अनुचित प्रकारांना कोणत्याही परिस्थितीत थारा देता कामा नये. प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी,

अशी मागणी पुसद शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली. या वेळी अल्प. प्रदेश महासचिव सय्यद इस्ती्यक,शहर अध्यक्ष झिया शेख ऍड.प्रभाकर विघ्ने अध्यक्ष दलित आघाडी,अभिलाष खैरमोडे अध्यक्ष युवक विधानसभा,संजय कान्हेड, गाझी उसामा,सेनेचे विजय बाबर,फिरोज खान, बाबाराव वाघमारे, डॉ. मोहसीन युवक काँग्रेस अध्यक्ष,प्रकाश नेमयते,रवी कांबळे यांच्या स्वक्षरी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close