पुसद शहरात क्रांतीवीर बिरसा मुंडा जयंतीचे आयोजन होणार आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन!

पुसद: शहरात क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या १५१व्या जयंती निमित्त बिरसा ब्रिगेड जयंती उत्सव समितीच्या वतीने दि१५ नोंहबर २०२६ रोजी भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात येणार आहे.या कार्यक्रमांसाठी शहरासह तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बिरसा मुंडा जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
पुसद शहरात क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या १५१व्या जयंती निमित्त बिरसा ब्रिगेड जयंती उत्सव समितीच्या वतीने दि१५ नोंहबर २०२६ रोजी भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी दि१५नोहबर २०२६रोज रविवार सकाळी ९ :०० वाजता क्रांतिवीर बिरसा मुंडा चौक येथे ना. ॲड.इंद्रनील नाईक आदिवासी विकास राज्यमंत्री महा. राज्य, संभाजीराव सरकुंडे, सेवानिवृत्त सनदी अधिकारी,माजी आमदार ॲड.निलयभाऊ नाईक, माजी. आमदार डॉ.वजाहत मिर्झा, माधवराव वैद्य से. नि. उपायुक्त समाजकल्याण, रंगराव काळे, माजी शिक्षणाधिकारी ऍड आशिष देशमुख, सदस्य बार कौन्सिल ऑफ इंडिया ऍड मोहिनीताई नाईक नगराध्यक्षा नगरपरिषद पुसद डॉ. मोहमद नदीम काँग्रेस सरचिटणीस महाराष्ट्र शरद मैंद, सचिन नाईक, बाळासाहेब कामारकर पाटील, सुरेश धनवे, तसेच आदिवासी समाजाचे जेष्ठ मंडळी व विविध क्षेत्रात काम करणारे सर्व सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनपर कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानंतर दुपारी १२:३० वाजता आदिवासी सामाजतील विविध मान्यवरांच्या हस्ते शोभायात्रेच्या मिरवणूकीचे उद्घाटन होणार आहे.ही भव्य मिरवणूक क्रांतिवीर बिरसा मुंडा चौक येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुभाषचंद्र बोस चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मुखरे चौक मार्गे वसंतराव नाईक चौक येथे समारोप होणार आहे.या कार्यक्रमाला विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर,लोकप्रतिनिधी, अधिकारी तसेच आदिवासी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीसह सकल समाज बांधव उपस्थित राहणार आहेत.यावेळी भगवान बिरसा मुंडा यांचे कार्य सर्व जाती-धर्मांसाठी प्रेरणादायी!क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांनी केवळ आदिवासी समाजाच्या हक्कांसाठीच संघर्ष केला नाही, तर भारतात राहणाऱ्या प्रत्येक जाती-धर्मातील अन्यायग्रस्त, शोषित आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी अन्याय, अत्याचार व शोषणाविरुद्ध लढा दिला. ब्रिटिश सत्तेविरुद्ध त्यांनी केलेला संघर्ष, समाजाला दिलेली एकजुटीची शिकवण, स्वाभिमानाचा संदेश आणि त्यांचे क्रांतिकारी विचार आजही संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत, तसेच आदिवासी समाजाची एकजूट, संस्कृती, परंपरा आणि अस्मिता जपली जावी, हा या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे.या मिरवणुकीमध्ये आदिवासी कर्मचारी संघटना, अफ्रोट संघटना, बिरसा क्रांती दल, आदिवासी विकास परिषद, आदिवासी पँथर संघटना, विद्यार्थी बिरसा ब्रिगेड तसेच गावोगावच्या विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.तरी पुसद शहर व परिसरातील सर्व आदिवासी बांधव-भगिनी, युवक-युवती, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्वजाती-धर्मांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक जयंती सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन बिरसा ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य संघटक पांडुरंग व्यवहारे, विदर्भ सचिव पै. नाना बेले, जिल्हाध्यक्ष पुसद मारोती भस्मे, तालुकाध्यक्ष गजानन उघडे, जिल्हा उपाध्यक्ष परसराम डवरे, सखाराम इंगळे, विठ्ठल मीरासे, विष्णु शिकारे, गजानन भोगे संदेश पांडे नत्थू आढाव, महिला बिरसा ब्रिगेड तालुकाध्यक्ष सुनिताताई मळघणे, मनीषा बेले, मीनाक्षी व्यवहारे, उषाताई टारफे, छायाताई बळी, सुनंदा ठाकरे, महानंदा वंजारे व गोकुळा बोडखे यांनी केले आहे.



