पुसद शहरात रात्री, अपरात्री रस्त्यांवरून धडाधड; बुलेटस्चावारांचा धुडगूस, फटाक्यांच्या आवाजाने नागरिक त्रस्त!

पुसद: शहरात सध्या मोठ्या प्रमाणात बुलेटच्या फटाक्यांचा धडाधड आवाज करत रस्त्यावरून धावणाऱ्या दुचाकीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रात्री,अपरात्री रस्त्यांवरून धडाधड आवाज करत जाणाऱ्या या बुलेटरोमियोमुळे पादचारी आणि विशेषतः जेष्ठ नागरिक,व मुली त्रस्त झाले आहेत. वाहतूक पोलिसांनी शहरातील परिसरात रात्री अपरात्री धुडगूस घालणाऱ्या या बुलेटबाजांना आवर घालावा अशी मागणी नागरिकाकडून करण्यात येत आहे.
प्रत्यक्षात बुलेट ही आकर्षक दुचाकी.. रस्त्याने धडधड करत धावणारी बुलेट अनेकांचे लक्ष वेधून घेत असली तरी.. मात्र मागील काही वर्षांपासून बुलेट ही वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.. या बुलेटच्या सायलेन्सर मध्ये बदल करून अनेक टवाळखोर तरुण फटाक्यांचा आवाज काढतात. रस्त्याने जाणाऱ्या अशा दुचाकीमुळे सर्वसामान्य नागरिक घाबरतात, लहान मुले,मुली व महिला अचानक येणाऱ्या या आवाजामुळे दचकतात. परिणामी अपघाताची शक्यता असते.. त्यामुळे अशा फटाके फोडणाऱ्या बुलेटस्वारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. मागील काही दिवसांपासून पुसद शहरातील परिसरात अशाच या बुलेटबाजांनी अक्षरशः धुडगूस घातला आहे. रात्री अपरात्री ही टार्गेट मुलं घोळक्याने बुलेट घेऊन येतात आणि फटाक्यांच्या आवाजाने रात्रीची शांतता भंग करतात. मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. मात्र पोलीस या बुलेटबाजांना आवर घालण्यात कमी पडतांना दिसत आहेत. 
दरम्यान काही दिवसांपूर्वीच पुसद वाहतूक शाखेच्या पोलिसांनी बुलेट गाडीचे सायलेन्सर मॉडीफाय करून कर्णकर्कश्श आवाज करणाऱ्यांवर कारवाई केली होती. या बुलेटच्या मॉडीफाय सायलेन्सर वर बुलडोजर फिरवला होता. मात्र असं असलं तरीही ही मोहीम आणखी तीव्र करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली जात आहे. बुलेटच्या सायलेन्सरमधून येणारा कर्कश आणि फटाक्यांसारखा आवाज हा सध्या सर्वसामान्यांसाठी आणि वाहतूक पोलिसांसाठी एक अत्यंत गंभीर प्रश्न आणि ऐरणीवर आलेला विषय बनला आहे. बुलेटमध्ये बेकायदेशीर फेरबदल करून सायलेन्सर बदलले जातात, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होते. या वाढत्या समस्येमुळे नागरिक त्रस्त असून, वाहतूक पोलिसांनी या समस्येचे गांभीर्य ओळखून याविरोधात तीव्र मोहीम हाती घेण्याची गरज असून मोटर वाहन कायद्यानुसार अशा टवाळखोर बुलेट स्वारावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.



