क्राइम

नकली नोटा छपाईच्या प्रकरणातील रेकॉर्डवरील गुन्हेगारास लातूर जिल्ह्यातून अटक; पुसद उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची मोठी कामगिरी!

पुसद : तालुक्यातील बोरी खुर्द येथील रहिवाशी असलेला विनोद कुरोडे यांनी काही साथीदारांसोबत संगणमत करून घरगुती प्रिंटर आणि केमिकल चा वापर करून पाचशे रुपयांच्या नकली नोटा तयार करत असताना पुसद पोलिसांनी धाड टाकून काही आरोपींना अटक केली होती परंतु या नकली नोटाच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हातावर तुरी ठेवून गेल्या सात महिन्यापासून फरार झाला होता पण त्या नकली नोटा छपाईच्या प्रकरणातील रेकॉर्डवरील मुख्य सूत्रधार या गुन्हेगारास आता पुसद उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या पथकाने तांत्रिक पुरावे आणि गोपीनिय बातमीदार कडून मिळालेल्या माहितीद्वारे आरोपीला लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील शिरुळ ताजबंद येथुन मोठ्या शिताफीने अटक केली आहे. विनोद केरबाजी कुरोडे वय ४८वर्ष रा.बोरी खुर्द ता. पुसद जि. यवतमाळ, नकली नोटा छपाई प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपीचे नाव आहे.याबाबत पोलीस सूत्राने ‘झेप न्यूज’ ला दिलेली माहिती अशी की,नकली नोटा बनविणाऱ्या टोळीतील ०७ महिण्यांपासुन फरार आरोपीस उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पुसद पथकाने केली अटक कार्यवाही.पुसद शहर पोलीस स्टेशनमध्ये अप.क. ४५/२०२६ कलम १७८, १८०, १८१,३(५) भा. न्या.सं. वाढीव कलम १११ भा. न्या.सं. अन्वये दि.१७जानेवारी२०२६ रोजी नकली नोटा बनविणे या संबंधाने नोंद असलेल्या गुन्हांतील मुख्य सूत्रधार आरोपी नामे विनोद केरबाजी कुरोडे, वय ४८ वर्षे, रा. बोरी (खुर्द), ता. पुसद, जि. यवतमाळ हा गेल्या सात महिन्यापासुन पोलिसाच्या हातावर तुरी देऊन फरार होता. सदर आरोपी याची तांत्रिक पुरावा व गोपनीय सुत्रधार यांचेकडुन माहिती केली तेव्हा सदर आरोपी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील शिरूळ ताजबंद, गावात असल्याची माहिती पुसद उपविभागीय अधिकाऱ्याच्या पोलीस पथकाला मिळाली त्यावेळी वरिष्ठाच्या आदेशाने पोलीस पथकाने तात्काळ शिरूळ ताजबंद येथे आरोपी अटक करण्यासाठी रवाना झाले. परंतु तपासा दरम्यान आरोपी हा त्या गावात नाव बदलून लपून राहत होता त्यावेळी पोलिस पथकाने मोठ्या शिताफीने सापळा रचून सदर आरोपीस दि.२८जुलै२०२६ रोजी अटक कार्यवाही केली.फरार आरोपी नामे विनोद केरबाजी कुरोडे, रा. बोरी खूर्द यांची नमुद गुन्हांत अटक कारवाई कुमार चिंता, जिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ, अशोक थोरात, मा. अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांचे मार्गदर्शनानुसार व अमर एम. मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग पुसद यांचे आदेशाने पोउपनि दिपक उईके, पोहवा सुनिल मदने, पोअं/ चंद्रेशखर गिरी यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close