ईतर

गावठाण फीडरला वीजपुरवठा सुरळीत करा ,अन्यथा रस्त्यावर उतरू ; महावितरणला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा-शेतकरी नेते मनीष जाधव!

महागाव : तालुक्यातील पोंहंडुळ ,तीवरंग, दहिसावळी ,भोसा, चिखली मलकापूर या गावांना चार– चार दिवस वीज पुरवठा खंडित राहत असल्याने याबाबत महावीज वितरण कंपनीला सतत तक्रार करूनही महागाव तालुक्यातील गुंज सबस्टेशनवर कार्यरत असलेले तांत्रिक प्रशासकीय अभियंता दखल घेत नसल्याने स्थानिक नागरिकाचा मानसिक उद्रेक झाला यामुळे आज शेतकरी नेते मनीष जाधव यांच्या नेतृत्वात पुसद कार्यकारी उपअभियंता कार्यालय पुसद येथे धडक देऊन स्थानिक नागरिकांनी उपविभागीय कार्यकारी अभियंता यांच्या समोर खंडित वीज पुरवठा बाबत तक्रारीचा पाढा वाचला पीठ गिरणी बंद , पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव अधिक असल्याने गावात स्थानिक नागरिक बिमार पडत आहे याची सर्व अडचणीची दखल घेऊन कार्यकारी उपविभागीय अभियंता पंकज चव्हाण साहेबांनी संबंधित गुंज येथील कार्यरत असलेल्या गौर अभियंताला वीज पुरवठा सुरळीत करून स्थानिक नागरीकांची गैरसोय टाळावी अशा सूचना दिल्या
चव्हाण साहेबांच्या कार्यकाळात पुसद उपविभागामध्ये चांगली वीजपुरवठा होत असल्याचे सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.

मात्र कायम वादात राहणाऱ्या गुंज सबस्टेशन बाबत अनेक तक्रारी आहेत त्यामुळे या सर्व गावांना अनंतवाडी सब स्टेशन वरून नवीन प्रस्तावित असलेल्या नवीन उभारणी करण्यात आलेल्या सब स्टेशन वरून वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी देखील यावेळी स्थानिक गावकऱ्यांनी केली संबंधित कार्यक्षेत्रामध्ये काम करणारा लाईनमन सतीश जाधव हे कामचुकारपणा करून फोन न ,उचलणे तक्रारीची दखल न घेणे अशा पद्धतीचं कार्यपद्धतीमध्ये कर्तव्यात कसूर करणाऱ्या या लाईनमन बद्दल देखील त्यांनी उल्लेख करून समस्या मांडल्या यावेळी साहेबांना सांगितले या सर्व गावकऱ्यांच्या वतीने यावेळी निवेदन करण्यात आले.

या निवेदनाला उत्तर देत खंडित वीज पुरवठ्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढू दिलासा देऊ असे आश्वासन महावीज वितरण कंपनीकडून देण्यात आले जर यामध्ये उशीर झाल्यास रस्त्यावर उतरून निरपेक्ष न्याय घेऊ असा निर्धार करून महावीर वितरण कंपनीला शेतकऱ्यांनी गर्भित इशारा दिला यावेळी शेतकरी नेते मनीष जाधव विकास राठोड काटखेडा शेषराव राठोड माजी सरपंच रितेश रामराव जगताप अंकुश आडे निवृत्ती जगताप हर्षल सोनार प्रकाश आडे मोठ्या संख्येने सर्व गावातील नागरिक उपस्थित होते खंडित वीज पुरवठ्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढू असे आश्वासन चव्हाण साहेबांकडून देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close