खबरदार..! धार्मिक स्थळावर विनापरवानगी भोंगे लावल्यास कडक कारवाई होणार!

पुसद : शहर पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धार्मिक स्थळांवर विनापरवाना लावलेले भोंगे हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत शहरातील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अनेक धार्मिक स्थळांच्या विविध विश्वस्ताने स्वइच्छेने भोंगे काढून घेतले असून, शहर धार्मिक स्थळे भोंगेमुक्त करण्यात सुरुवात झाली आहे तर नियमांचे उल्लंघन करून पुन्हा भोंगे लावल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कोणत्याही धार्मिक स्थळावरील भोंगा हा धार्मिक प्रथेचे अविभाज्य भाग नाही. त्यामुळे धार्मिक स्थळांवरील जे भोंगे ध्वनी प्रदूषण करत असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करा, असे आदेश देत वि.उच्च न्यायालयाने कारवाई बाबत थेट दिशादर्शन केले. वि. उच्च न्यायालयाने क्रिमिनल रिट पिटीशन नं. ४७२९/२०२१ या संदर्भात बेकायदेशीररित्या बसवलेले भोंगे (लाऊड स्पीकर) इत्यादींमुळे होणा-या ध्वनी प्रदुषाणाबाबत कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्याअनुषांगाने मा. पोलीस महासंचालक कार्यालय म.रा. मुंबई- यांचे परिपत्रक क. पोमसं/ २४/३४/३५४/२०२५ दि. ११/४/२०२५ व मा. पोलीस महासंचालक कार्यालय म.रा. मुंबई- यांचा स्थायी आदेश क ०२/२०२५ अन्वये अनधिकृतपणे / विनापरवानगीने लावलेले लाऊड स्पीकर / भोंगे इत्यादींवर ध्वनी प्रदुषण (विनियमन व नियंत्रण) नियम-२०००, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१, भारतिय नागरिक सुरक्षा संहिता २०२३, भारतिय न्याय संहिता २०२३ अशा विविध कायदयान्वये गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करण्यात यावी असे सक्त आदेश वरिष्टांनी दिलेले आहेत.
त्या आदेशानुसार पोलीस स्टेशन पुसद शहर हद्दीतील सर्व मंदिर, बुध्द विहार, चर्च, मस्जिद, दर्गा, अशा व इतर सर्व प्रकारच्या धार्मिक व सामाजिक स्थळावरील विनापरवाना लावलेले लाउड स्पीकर / भोंगे काढून घेण्यात यावे अशा सुचना सर्व सर्व मंदिर, बुध्द बिहार, चर्च, मस्जिद, दर्गा, अशा व इतर सर्व प्रकारच्या धार्मिक व सामाजिक स्थळावरील लाऊड स्पीकर्स काढण्याच्या तीन मिटींग घेवून सुचना/ निर्देश देण्यात आल्या होत्या व कायद्याचे तंतोतंत पालन करण्यात यावे अन्यथा प्रशासन कायदेशिर कार्यवाही करणार असल्याचे अवगत करण्यात आलेले होते.त्याअनुषंगाने जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक कुमार चिंता साहेब अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात साहेब, सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागयी पोलीस अधिकारी पुसद हर्षवर्धन बि.जे. साहेब, हयांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनामध्ये प्रथमतः आज दि. ४ एप्रिल २०२६ रोजी पुसद शहर हददीमधील संभाजी नगर, मधील लंबीनी बुध्द विहार मध्ये लावलेले विनापरवाना लाउड स्पीकर्स हे तेथील सुज्ञ महीला मंडळ व जागो भिमसैनिक मित्र मंडळ, संभाजी नगर चे सदस्यांनी, तसेच दि. ५ एप्रिल २०२६
रोजी जामा मस्जिद, गढी वार्ड मध्ये लावलेले विनापरवानगी ने लावलेले लाऊड स्पीकर्स / भोंगे हे तेथील सुज्ञ जामा मस्जिदचे विश्वस्त इक्बाजल अहमद खॉ. मिर आलम खॉ.अध्यक्ष, सै. सैफोद्दीन सै. फकीरोद्दीन, हाजी सै. बसरत अली सै. कादर अली व त्यांचे इतर सहकार्याने तसेच श्री हनुमंत बापु ट्रस्ट
विठाळा वार्ड, पुसद चे अध्यक्ष हनवंतराव आनंदराव शिंदे, सुभाष विठ्ठलराव चव्हाण, विष्णू रणखांब इत्यादींनी सुध्दा मंदिरावर लावलेले भोंगे स्वच्छेने काढले व स्वयंस्फुर्तीने पुसद शहर चे ठाणेदार सेवानंद वानखेडे व पोउपनि राजू ठोमरे, गोपनिय अंमलदार अभिमन्यू चव्हाण, नितेश भालेराव यांचे उपस्थितीत काढून घेतले. व कायद्याचे व नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे पोलीस प्रशासनास आश्वासन दिले. पोलीसांनी सुध्दा त्यांचे आभार मानून अशाच प्रकारे सर्वांनी पुसद शहर मधील लावलेले विनापरवाना लाउड स्पीकर्स / भोंगे सर्व विश्वस्त / संचालकांनी स्वेच्छेने व स्वयंस्फुर्तीने काढून घेवून कायदेशिर कार्यवाही टाळावी असे आवाहन ठाणेदार सेवानंद वानखेडे यांच्यावतीने करण्यात आले.



