क्राइम

पुसद शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना! बेदम मारहाण करून विवस्त्र अवस्थेत सोडलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू!

पुसद: शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील काकडदाती परीसरात एका व्यक्तीचे दोरीच्या साह्याने हात बांधून विवस्त्र करून बेदम मारहाण करून त्याला मोकळ्या जागेत विवस्त्र अवस्थेत सोडून दिले. त्या जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दि. १ एप्रिल २०२६ रोजी घडली.सकाराम हुलकाने वय ४० वर्षे रा. श्रीरामपूर या मारहाणी नंतर उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

 पोलिसांनी सूत्राने दिलेल्या माहितीनुसार नुसार मय्यताचा चुलत भाऊ शिवानंद शंकर हुलकाने वय ३२ वर्षे रा. श्रीरामपूर याने पुसद शहर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली की,दि.१एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या  मोबाईलवर कॉल आला आणि त्या व्यक्तीने माहिती दिली की काकडदाती येथील कृष्ण मंदिराजवळ विठ्ठल भाकरे यांच्या घरासमोर तुझ्या चुलत भावाला म्हणजे मय्यत सखारामला काही जण विवस्त्र करून बेदम मारहाण करीत आहेत त्यावेळी तात्काळ शिवानंद हे घटनास्थळी पोहोचला असता सखारामचे हात-पाय दोरीने बांधून विवस्त्र अवस्थेत रस्त्यावर टाकण्यात आले होते त्यावेळी मारहाण करणारे विठ्ठल नागोराव भाकरे, रोहन भाकरे, प्रशांतकुमार उर्फ पवन भाकरे (सर्व रा. काकडदाती) व योगेश उत्तम भाकरे (रा. बोरी खुर्द) हे तेथेच उपस्थित होते. यापैकी विठ्ठल भाकरे हा पाईपने चापटा, लाथा-बुक्यांनी सखारामला मारहाण करीत करीत होते त्यावेळी शिवानंदने मारहाण करणाऱ्या व्यक्तींना विचारले असता त्यांनी स्पष्ट सांगितले की तू याला येथून घेऊन जा त्यावेळी सखाराम याला कपडे घालून श्रीरामपूर येथे घरी नेण्यात आले. परंतु या मारहाणीत सखारामच्या शरीरावर गंभीर इजा झाल्याने त्याला सायंकाळी ६ :३० वाजण्याच्या सुमारास पुसद येथील मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.पण मारहाणीत गंभीर दुखापत झालेल्या व्यक्तीला डॉक्टरांनी नांदेड येथे हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार जखमीला प्रथम निर्मल हॉस्पिटल व नंतर विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याच्यावर उपचार सुरू असताना दि.४एप्रिल २०२६रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली या प्रकरणाचा अधिकचा तपास शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गोपाल इंद्राळे व त्यांचे पथक करीत आहे पुसद शहर डीबी पथकाने चारही आरोपींना अटक केली आहे. परंतु अमानुष मारहाणीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close