क्राइम

खळबळजनक! सेवादास नगर शेत शिवारात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला, घातपाताचा संशय;श्वानपथकास पाचारण! वसंत नगर पोलिसांकडून तपास सुरु!

पुसद : शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पुसद -वाशिम राज्य मार्गालगत सेवादास नगर शेत शिवारातील शेतीच्या कडेला एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.घटनेची माहिती गावातील पोलीस पाटलांनी पोलिसांना दिली असता उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सह्याक पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी.जे. यांनी उपविभागातील सर्वच पोलिस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी व पोलीस पथक डिबी पथक स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांनी घटनास्थळी दाखल होऊन पुढील कारवाई करण्याचे आदेशीत केले असता घटनास्थळी धाव घेतलेल्या पोलीसांनी प्राथमिक माहितीनुसार, दगडाने ठेचून या अज्ञात इसमाचा खून केल्याचा संशय पोलीसांकडून व्यक्त केला जात आहे.मृतदेहाची ओळख पटत नसल्याने किंवा संशयास्पद अनोळखी मृतदेह आढळल्याने पोलिसांनी श्वानपथकास (Dog Squad) पाचारण केले आहे.या अज्ञात इसमाची हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून या मृतदेहाची ओळख पटविण्याचा काम सध्या वसंत नगर पोलिस करत आहेत.

याबाबत सूत्राने ‘झेप न्यूज’ ला दिलेली माहिती अशी की,पुसद शहर एकेकाळी सांस्कृतिक आणि विद्येचे माहेरघर असलेल्या पुसद पोलीस उपविभागात गुन्हेगारी सत्र वाढतच चालले आहे. वसंत नगर पोलीस स्टेशनचे हद्दीत आधीच अवैध धंद्याने धुमाकूळ घातला आहे अवैध गावठी दारू, देशी दारू, अवैध मटका, जुगार, शेतकऱ्याच्या शेतातील मोटर चोरी करणे, प्रतिबंधित गुटखा या अवैध व्यवसायाने हे परिसर दनानुन टाकला आहे तर दुसरीकडे या पोलीस स्टेशनने ज्या बीट जमादारावर या बीटची शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी दिली आहे ते बीट जमादार अवैध धंद्यांवाल्याशी हात मिळवणी करून वसुलीत दंग असताना दिसुन येत आहेत त्यामुळे आपल्या बीट मध्ये हे बीट जमादार कोणत्याही दिवशी गस्त न घालता फक्त अवैध धंद्येवाल्याकडुन पठाणी वसुली करत असतात त्यामुळे या बीटमध्ये अवैध धंद्ये जास्त फोफावले असून आता खुनासारख्या घटना घडू लागल्या आहेत. याच स्टेशनच्या बीटमध्ये आज पुन्हा एक खळबळजण घटना उघडकीस आली आहे शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पुसद-वाशिम राज्य मार्गालगत सेवादास नगर शेत शिवारातील शेतच्या व कडेला एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही.या घटनेची माहिती एका शेतात जेसीबी मशीन चालक काम करत असताना त्यांच्या निदर्शनास आली असता त्या चालकाने तात्काळ गावातील पोलीस पाटलांना माहिती दिली त्यावेळेस पोलीस पाटलांनी सबंधित पोलिसांना माहिती दिली असता उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सह्याक पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी.जे. यांनी उपविभागातील सर्वच पोलिस स्टेशन मधील सर्व पोलीस अधिकारी व पोलीस व डिबी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांना घटनास्थळी दाखल होऊन पुढील कारवाई करण्याचे आदेशीत केले असता या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून पोलीसांच्या प्राथमिक माहितीनुसार, दगडाने ठेचून या अज्ञात इसमाचा खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या मृतदेहाच्या अंगावर काळ्या रंगाचे पॅन्ट व पिवळट लाईट कलरचे शर्ट आहे, परंतु अजूनही मृतदेहाची ओळख पटत नसल्याने किंवा संशयास्पद अनोळखी मृतदेह आढळल्याने पोलिसांनी श्वानपथकास (Dog Squad) पाचारण केले आहे.या इसमाची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत असून या मृतदेहाची ओळख पटविण्याचा काम सध्या वसंत नगर पोलिसांकडून सुरू आहे.सदर अनोळखी इसमा बाबत कोणास काही माहिती असल्यास पुसद वसनगर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या प्रकरणा अधिकचा तपास पुसद वसंत नगर पोलिस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close