ईतर

सेवादास नगर शेत शिवारातील खून दोन आरोपींनी लुटीच्या उद्देशाने केल्याचा उलगडा आरोपी निष्पन्न! एका आरोपीस अटक ; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची मोठी कारवाई!

वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना..

पुसद : शहरातील वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सेवादास नगर शेत शिवारातील परिसरात पुसद-वाशिम राज्यमार्गालगत दि.२५ एप्रिल रोजी एक खळबळजनक बातमी समोर आली होती सेवादास नगर शेत शिवारातील ई क्लासच्या पडीक जमिनीवर एका अज्ञात व्यक्तीचा दगडाने ठेचून खून झाला असल्याची  घटना उघडकीस आली होती अज्ञात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती त्यावेळी ही बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली तसेच सोशल मीडियावर व प्रसार माध्यमाने या घटनेच्तया बातम्याही प्रकाशित झाल्याने अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांपुढे ठाकले होते परंतु घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मात्र प्रथमदर्शनी पाहणीत या अज्ञात व्याक्तीचा कोणीतरी अज्ञातांनी घात केला असावा असा कयास लावला जात होता. त्यावेळी या मृतदेहाची ओळख पटली मय्यत दिलीप महादू ठाकरे हा फेट्रा येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले त्यावेळी वसंत नगर पोलीस स्टेशनचे येथे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता व पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असता हा खून लुटीच्या उद्देशाने आरोपीने केल्याचा आज उलगडा झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

याबाबत सूत्राने ‘झेप न्यूज’ ने या घटनेची बातमी प्रकाशित केली होती की, पुसद शहर एकेकाळी सांस्कृतिक आणि विद्येचे माहेरघर असलेल्या पुसद पोलीस उपविभागात गुन्हेगारी सत्र वाढतच चालले आहे. वसंत नगर पोलीस स्टेशनचे हद्दीत आधीच अवैध धंद्याने धुमाकूळ घातला आहे अवैध गावठी दारू, देशी दारू, अवैध मटका, जुगार, शेतकऱ्याच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटर चोरी करणे, प्रतिबंधित गुटखा या अवैध व्यवसायाने हे परिसर दणाणून गेला असून या अवैध धंद्यांमुळे अनेकजण व्यसनाधीन होऊन गुन्हेगारीकडे वळत असल्याचे वास्तव समोर येत आहे त्यामुळे ही युवा पिढी तर पार भरकटली आहे. या पोलीस स्टेशनने ज्या बीट जमादारावर या बीटची शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी दिली आहे ते बीट जमादार अवैध धंद्यांवाल्याशी हात मिळवणी करून वसुलीत दंग असतात त्यामुळे आपल्या बीट मध्ये हे बीट जमादार कोणत्याही दिवशी गस्त न घालता फक्त अवैध धंद्यावाल्याकडून पठाणी वसुली करीत असतात त्यामुळे या बीटमध्ये अवैध धंद्ये जास्त फोफावले असून आता खुनासारख्या घटना घडू लागल्या आहेत. तेच सत्य आज या खून प्रकरणातून समोर आले आहे.या खुनाच्या गुन्हयाचा उलगडा झाला असून हा खून लुटीच्या  उद्देशाने केला आहे अनोळखी दोन आरोपी निष्पन्न करुन एका आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.हा लुटीच्या हेतुने केला असून मय्यताची मोटार सायकल आरोपीकडून जप्त केली आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ पथकांनी दि,२५ एप्रिल २०२६ रोजी उपविभाग पुसद येथे हजर करीत असतांना माहीती मिळाली कि, मौजे पुसद ते वाशिम रोडवरील खंडाळा घाटातील सेवादासनगरचे शिवारातील ई क्लास जमीनच्या ठिकाणी मृतक दिलीप महादु ढाकरे वय ३९ वर्ष, रा. फेट्रा ता. पुसद जि. यवतमाळ यास कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणाने त्याचे डोक्यावर दगड टाकून जिवेठार मारुन पुरावा नष्ट करण्याच्या इराद्याने चेहरा विद्रूप केलेल्या स्थितीत मिळून आल्याने पोलीस स्टेशन वसंतनगर अप क्रमांक १५४/२०२६ कलम १०३ (१), २३८ भान्यास प्रमाणे दि.२७ एप्रिल २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.सदर प्रेताची पाहणी करता त्यास कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी कारणाने जिवेठार मारुन पुरावा नष्ट करण्याच्या इराद्याने त्याचा चेहरा विद्रूप केला होता. त्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी पोलीस निरीक्षक स्थागुशा यवतमाळ यांना सदर गुन्हयातील अनोळखी आरोपी शोध घेवून गुन्हा उघडकीस आणन्या करीता आदेशित केले होते. पोलीस निरीक्षक, स्थागुशा यवतमाळ यांनी त्यांचे अधिनस्थ स्थानिक गुन्हे शाखा कॅम्प पुसद पथक यांना सदर गुन्हयातील मृतक यांचे अज्ञात मारेकरी यांचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणन्याकरीता आदेशित केले त्यासाठी स्थागुशा कॅम्प पुसद कडील अधिकारी व अंमलदार यांच्या पथकांने गुन्ह्यांचे घटनास्थळी भेट देवून बारकाईने पाहणी केली गुन्ह्याच्या अनुषंगाने मृतक यांचे नातेवाईक यांच्याकडे सखोल तपास करुन गुन्हा उघडकीस आणन्याचा प्रयत्न करीत असतांना दि.२७ एप्रिल२०२६ रोजी स्थागुशा यवतमाळ कॅम्प पुसद कडील पथक मृतक यांचे मारेकरी व गुन्ह्यातील मृतक यांचे मोटार सायकल बाबत माहीती काढत असतांना पोहवा १८६७ कुणाल मुंडोकार यांना गोपनिय माहीती मिळाली कि, मृतक दिलीप महादु ढाकरे यांची बजाज कंपनीची प्लॅटीना मोटार सायकल ही सेवादास नगर येथील इमस नामे गोपाल ऊर्फ गोलु बाळ पवार यांच्याकडे असून तो विक्री करीत आहे अशी माहीती मिळाल्याने संशयीत इसम गोपाल ऊर्फ गोलु बाळु पवार रा. सेवादास नगर ता. पुसद जि. यवतमाळ यास अतिशय शिताफिने पोलीस कौशल्याचा वापर करुन ताब्यात घेवून गुन्ह्यांच्या अनुषंगाने विचारपूस केली असता उडवा-उडवीचे उत्तरे देत असल्याने त्यास अधिक विश्वासात घेवून अतिशय चिकाटीने गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने व त्याचे साथीदार प्रकाश ऊर्फ पक्या पक्या उत्तम राठोड यांनी मृतक यांच्याकडे लुटमार करुन पैस मिळविण्याच्या इराद्याने मृतक खंडाळा घाटात रोडच्या बाजूला खाली बसलेला दिसल्याने त्यास फरफरट खंडाळा घाटाच्या खाली एका निंबाच्या व काटेरी झाडा खाली नेवून त्याचे पॅन्टीची व शर्टची खिसे चेक करुन त्याचे डोक्यावर लहान व मोठ्या आकाराचे दगड टाकून पुरावा नष्ट करण्याचे इराद्याने चेहरा विदृप करुन जिवेठार मारुन त्याची मोटार सायकल घेवून गेले असल्याचे निष्पन्न करुन वसंतनगर पोलीस स्टेशन अप क्रमांक अप क्रमांक १५४/२०२६ कलम १०३ (१), २३८ भान्यास हा अतिशय क्लिष्ट व गुंतागुतीचा गुन्हा उघड करुन आरोपी १) गोपाल ऊर्फ गोलु बाळु पवार वय २६ वर्ष, रा. सेवादास नगर ता पुसद जि. यवतमाळ येथून ताब्यात घेवून पुढील तपास कामी पोलीस स्टेशन वसंतनगर यांच्या ताब्यात दिले.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता (भा.पो. से) सा, मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात (म.पो. से) सा, मा. सहा पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद हर्षवर्धन बी. जे सा तसेच मा. पोलीस निरीक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, मा. पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे पोलीस स्टेशन वसंतनगर यांचे मार्गदर्शनात सपोनि धिरज बांडे, पोउपनि शरद लोहकरे, सफौ मुन्ना आडे, पोहवा संतोष भोरगे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, पोशि राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close