विनापरवाना फटाके वाहुन नेताना चारचाकी वाहन जळुन खाक;अवैधरीत्या फटाके विक्री व वाहतुक करणाऱ्या कारवाईची मागणी!

पुसद : सध्या दिवसेंदिवस उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे तर दुसरीकडे लगीन नाही सुरू आहे अशाच वेळी अवैधरित्या काही फटाका विक्रेते शहरात व ग्रामीण भागात बाराही महिने ठिकठिकाणी विनापरवाना गर्दीच्या ठिकाणी दुकाने थाटून बसले किंवा गोडाऊन मध्ये साठवणूक करून ठेवले आहेत तसेच फटाके इंधन किंवा इतर ज्वलनशील पदार्थ वाहून नेत्यांना वाहनाचे तापमान नियंत्रण ठेवणे बंधनकारक असताना सुद्धा हे विक्रेते अवैधरित्या या फटाक्याची वाहतूक करीत आहेत याच कारणाने काल पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कासोळा परिसरात एका चालत्या वाहनाने पेट घेतला असून हे अशोक लेलँड कंपनीचे चारचाकी वाहन फटाक्यामुळे दळून खाक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. एकीकडे उन्हामुळे वातावरण तापलं असून चालकांच्या प्रसंगावधाने वेळीच उतरल्याने मोठा अनर्थ टळला सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. विशेष म्हणजे कारवाईचा अधिकार असणाऱ्या मंडळीकडून या धोकादायक प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की,सध्या एप्रिल महिन्यातील उन्हाचा तडाखा अत्यंत तीव्र झाला असून, अनेक भागांत पारा ४२ अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे.एकीकडे या कडक उन्हातच लग्नसराईची धामधूम सुरू असुन एप्रिल महिन्यातील तळपता सूर्य हा मोठ्या प्रमाणावर आग ओकत असल्याने सकाळी साडेनऊ वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत उन्हाचा तडाका हा नागरिकांना जाणवत आहे.
तर या लगीनघाईसाठी लागणारे फटाके अवैधरीत्या मोठ्या प्रमाणावर विनापरवानगीने वाहतूक करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे तर अनेक शहरात बाराही महिने ठिकठिकाणी विनापरवाना गर्दीच्या ठिकाणी फटाके विक्रीची दुकाने सुरू केले असुन हे फटाके विक्रेत्यांनी अशा साठवणूक करून ठेवत विनापरवानगी वाहतूकही करीत आहेत स्फोटक आणि ज्वलनशिल चिजवस्तूंच्या वाहतुकीवर प्रतिबंध असताना देखिल सर्रासपणे अवैधरित्या फटाक्यांची वाहतूक अनेक जण लपून छपून वाहतूक करत असतांना दिसत आहेत अशीच विनापरवाना अवैधरित्या फटक्यांची वाहतूक करताना पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कसोळा परीसरात धोकादायक कृतीमुळे एका वाहनाला आग लागल्याची धक्कादायक घटना काल घडली आहे.
एका चालत्या वाहनाने पेट घेतला असून हे अशोक लेलँड कंपनीचे चारचाकी वाहन फटाक्यामुळे जळून खाक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. एकीकडे उन्हामुळे वातावरण तापलं असून चालकांच्या प्रसंगावधाने वेळीच उतरल्याने मोठा अनर्थ टळला सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.त्यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.परंतु तोपर्यंत वाहन जळुन खाक झाले असून लाखो रुपयांचा फटाक्यांची राख झाली आहे.विशेष म्हणजे, कारवाईचा अधिकार असणाऱ्या मंडळीकडून या धोकादायक प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.त्यामुळे अशा अवैधरीत्या विनापरवाना वाहतूक स्फोटके वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर व फटका विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.



