सराईत गुन्हेगारावर एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई;वर्धा कारागृहात रवानगी!

पुसद : विविध गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करत कारवाई करण्यात आली. पुसद शहर, वसंत नगर व पोफाळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सै.मुसव्विर है.जमील वय ३२ वर्षे रा.डोंगरगाव ता. महागाव जि. यवतमाळ, याच्याविरुद्ध मारहाण करणे, खुनाचा प्रयत्न करणे, रेती चोरी करणे, दहशत पसरविण्यासाठी अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणे, अवैधरित्या दारू बाळगून विक्री करणे, रात्रीला गुन्हे करण्याच्या उद्देशाने धमकाविणे, शिवीगाळ करणे, आडविणे, पत्रकारास धमकाविणे, जीवे मारण्याची धमकी देणे, जुगार खेळणे, अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. त्याच्याविरूद्ध यापूर्वी आवश्यक प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झालेली नव्हती. त्याच्या गुन्हेगारी वृत्तीमुळे परिसरामध्ये दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे अशा गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने या सराईत गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून, आरोपीची वर्धा येथील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी ‘झेप’ न्यूज ला दिलेली माहिती अशी की,वारंवार गंभीर गुन्हे करणाऱ्या तसेच समाजासाठी घातक ठरणाऱ्या गुन्हेगारीं प्रवृत्तीच्या व्यक्तीवर शहर पोलिसांकडून ‘एमपीडीए’ (महाराष्ट्र प्रिव्हेेन्शन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटीज) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये पुसद शहर पोलीस स्टेशन, व पोफाळी पोलिस स्टेशन तसेच वसंत नगर पोलीस स्टेशन हद्दीतमध्ये ग्राम डोंगरगांव येथील रहीवाशी असलेल्या सै. मुसव्वीर सै. जीमल वय – ३२ वर्षे रा. डोंगरगांव ता. महागांव जि. यवतमाळ हयाची सासरवाडी पुसद असल्याने पुसद व डोंगरगांव परिसरामध्ये खुनाचा प्रयत्न करणे, रेती चोरी करणे, अवैधरित्या दारु वाळगून विक्की करणे, रात्रीला गुन्हे करण्याच्या उद्दशाने धमकाविने, शिविगाळ करणे, अडविणे, याबाबत बातमी प्रकाशित केली म्हणून पत्रकाराला जिवाने मारण्याची धमकी देणे, अवैध अग्निशस्त्र गुन्हे करण्यासाठी व दहशत पसरविण्यासाठी बाळगणे, जुगार खेळणे, अशा एकूण १३ गुन्हे त्याचेवर या पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत अशा विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेला इसम से. मुसब्बीर सै. जमील वय – ३२ वर्षे रा. डोंगरगांव ता. महागांव जि. यवतमाळ यांचे कृत्ये दिवसेंदिवस वाढतच असून त्याचेवर प्रतिबंधक कार्यवाही करुन सुध्दा त्याचे गुन्हेगारी कृत्याला आळा बसत नसल्याने तो समाजामध्ये धोकादायक व्यक्ती म्हणून असल्याने त्याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्ये, विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती आणि दूकश्राव्य कलाकृतींचे बिनापरवाना प्रदर्शन करण्याा-या व्यक्ती वाळू तस्कर, जिवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणा-या व्यक्ती, बेकायदेशिर जुगार, बेकायदेशिर लॉटरी चालवणा-या आणि मानवी अपव्यपार करणा-या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम १९८१ (सुधारणा २०२५) चे कलम-३ (१) अन्वये धोकादायक व्यक्ती असल्याने त्याच्यावर मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी साहेब, यवतमाळ यांनी त्यांचा आदेश क. गृह शाखा / डेक्स /१२/कावि/ १०७८/२०२६ दि. २४जुन२०२६ पारीत करण्यात आलेला असून स्थानबध्द इसमास वर्धा कारागृह मध्ये दाखल करण्यात येत आहे.सदरची अतिविशेष कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक कुमार चिंता साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, पुसद हनुमंत गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शना मध्ये स्थागुशा चे पोनि सतिश चवरे, ठाणेदार सेवानंद वानखडे, पोउपनि अक्षय सनगर, पोका १६८३ मंगेश गायकवाड उपविपोअ कार्यालय पुसद, पोका / महेश वाकोडे स्थागुशा, पोहेकों/१४६३ मनोज कदम, पोका / शेख मेहबुब पोका / शुध्दोधन भगत, पोका / आकाश बाभूळकर, पोकों / पंजाब दयाल, यांनी केलेली आहे.



