ईतर

मुंबई येथे कृषी दिनानिमित्त प्रयोगशील शेतकऱ्यांचा भव्य पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन होणार; राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची पत्रकार परिषदेत माहिती!

पुसद : वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान मुंबईच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या जन्मदिनी व कृषी दिनाचे औचित्य साधून राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई येथे मंत्रालय विधिमंडळ पत्रकार संघाच्या पत्रकार कक्षात संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ना. श्री इंद्रनील नाईक यांनी दिली.या पुरस्कार वितरण सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय श्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार असून त्यांच्या शुभ हस्ते प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान व स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार असल्याची माहिती ना. नाईक यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दिली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची जयंती हे राज्यभरात कृषी दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात येते या कृषी दिनाचे औचित्य साधून मागील अनेक वर्षापासून मुंबई येथे वसंतराव नाईक कृषि व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने सातत्याने या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. शेतकऱ्यांना कौतुकाची थाप प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती ना. नाईक यांनी दिली. या पत्रकार परिषदेला प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री डॉ. राजेंद्र बारवाले सचिव श्री दीपक पाटील विश्वस्त श्री मुश्ताक अंतुले यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close