पुसद शहरात गोळीबाराचा थरार! दिवसाढवळ्या हवेत झाडल्या गोळ्या; आरोपी फरार!

पुसद: शहरात अलीकडच्या काळात गुन्हेगारीच्या घटना वाढत असल्याचे चित्र आहे. अशातच, शहरातील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या परीसरातील चहाच्या कॅन्टींगवर दिवसाढवळ्या भररस्त्यात गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला आहे. शहरातील अंजुम खान लियाखत आली खान हे त्याच्या मित्रासोबत चहा कॅन्टीनवर उभे असताना अचानक कॅन्टीन समोर काही अज्ञात व्यक्तीं स्विफ्ट चारचाकी गाडीतून आले आणि खाली उतरून पिस्तुलातून हवेत गोळ्या झाडल्या त्यावेळी त्यावेळी हे उभे असलेले पळू लागले तेवढ्यात या अज्ञातांनी जवळील चाकू काढून अंजुम खान यांच्या मित्रावर व चहा कॅन्टीन चालकावर वार केल्याने ते गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. व आरोपी आपली चार चाकी गाडी सोडून फरार झाले सुदैवाने या जीवघेण्या हल्ल्यात कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु अचानक झालेल्या गोळीबाराच्या आवाजामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
याबाबत ‘झेप’ न्यूज ला सूत्राने दिलेली माहिती अशी की, आज दि,२३ जून २०२६ रोजी सायंकाळी ४:३० ते ५:०० वाजण्याच्या सुमारास पुसद शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिसरातील मिश्रा यांच्या कॅन्टींनवर अंजुम खान लियाखत अली खान व त्याचे दोन मित्र चहा कॅन्टीनवर थांबले असताना अचानक त्या ठिकाणी स्विफ्ट डिझायर क्रमांक एमएच १० एडब्ल्यू ६४६१ येऊन थांबली त्यावेळी त्या चार चाकी गाडीतून चार जण खाली उतरले आणि हवेत दोन राउंड फायर गोळीबार करू लागले त्यावेळी त्यावेळी कॅन्टीन चालक शुभम जगदीश मिश्रा वय ३० वर्षे याच्यावर व अंजुमचे मित्र समीर शेख आणि सुलतान शेख यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला त्यावेळी अंजुमहा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वॉल कंपाऊंड उडी मारून पळ काढला त्यावेळी हल्लेखोर त्याचे चार चाकी वाहन सोडून फरार झाले सुदैवाने या गोळीबाळाच्या थरारक घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही किंवा हा जीवघेणा हल्ला हल्लेखोरांनी कां केला याचेही कारण अद्याप करू शकले नाही. या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच पुसद पोलीस विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्यासह वसंत नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि धिरज बांडे, सुगत पुंडगे, अक्षय सनगर, कुणाल मुंडोकार, मुन्ना आडे, सुनिल पंडागळे, संतोष भोरगे, अभिमन्यू चव्हाण, अरविंद चव्हाण, नितेश भालेराव व जलाल शेख यांच्यासह मोठा पोलीस फाटा घेऊन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने परिसराचा पंचनामा केला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी शहरातील मुख्य मार्गावर कडक नाकेबंदी करण्यात आली आहे. हे हल्लेखोर नक्की कोण होते आणि त्यांनी हा गोळीबार कोणत्या कारणासाठी केला, याचा तपास पोलीस करत आहेत. परंतु हा गोळीबार पूर्ववैमनस्यातून किंवा जुना वाद, गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा वैयक्तिक सूडबुद्धी झाला असल्याचा पोलिसाचा कयास आहे.सदर वृत्त लिहीपर्यंत या घटनेबाबत वस़ंतनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता ही प्रक्रिया सुरू असल्याची सूत्राची माहिती आहे.



