क्राइम

पुसद पोलीस उपविभागाच्या कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अनधिकृत धार्मिक स्थळांवरील १७५भोंगे हटविले!

पुसद : पोलिस उपविभागाच्या कार्यक्षेत्रातील सर्वच पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अनधिकृत धार्मिक आज पर्यंत स्थळांवरील भोंगे हटवण्याचे काम प्रगतिपथावर असून १७५ धार्मिक स्थळावरील भोंगे हटविले आहेत.ही कारवाई सामंजस्याने, धार्मिक तणाव निर्माण होऊ न देता केल्याबद्दल त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांचे कौतुक उपविभागीय पोलिस अधिकारी हर्षवर्धन बि.जे यांनी केले आहे तर हटविलेले भोंगे पुन्हा लावले तर संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी पोलिस अधिकाऱ्याला जबाबदार धरलं जाईल, असंही त्यांनी माहिती दिली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी ‘झेप न्यूज’ ला दिलेली माहिती अशी की,ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, नुसार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर किंवा भोंग्यांच्या वापरावर कडक निर्बंध घातले आहेत. या नियमांचे उल्लंघन झाल्यास भोंगे हटविण्याचे निर्देश दिले असून त्या अनुषंगाने सार्वजनिक किंवा अनधिकृत धार्मिक स्थळांवर भोंगे लावून वाजविल्यास तसेच ध्वनी प्रदूषण करीत असल्यास तसे निर्देशनास आल्यास अशा अनधिकृत धार्मिक स्थळावरील भोंगे तात्काळ हटविण्याचे आदेश मा.कुमार चिंता, जिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ, अशोक थोरात, मा. अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांनी दिले होते त्या आदेशान्वये हर्षवर्धन बी.जे. सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद पोलीस उपविभागातील चारही पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संबंधित प्रभारी पोलिस अधिकाऱ्यानी केलेली आहे. आपल्या हद्दीतील अनाधिकृत स्थळावरील होंगे काढले आहे. ही मोहीम राबवली आहे. त्यामुळे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही कारवाई केली आहे.हिंदू, मुस्लिम, बौद्ध, या धर्मस्थळावरी विश्र्वतांनी आप आपल्या धार्मिक स्थळांवरील १७५ भोंगे स्वतःहून उतरविले आहेत.त्यामध्ये शहर पोलिस स्टेशन पुसदच्या हद्दीतील- ४७,वसंतनगर पोलीस स्टेशन पुसदच्या हद्दीतील-२५, ग्रामीण पोलीस स्टेशन पुसदच्या हद्दीतील-१०१, खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील-२ असे एकूण १७५ अन अधिकृत/लाऊड स्पीकर भोंगे या पोलिस अधिकाऱ्यानी धार्मिक स्थळाच्या विश्वस्ताच्या सहमतीने व सामंजस्याने कोणताही धार्मिक तणाव निर्माण होऊ न देता काढून टाकले आहे.जर पुसद पोलीस उपविभागात कोणत्याही धार्मिक स्थळांवर अनधिकृतपणे भोंगे / लाउडस्पिकर लावले असतील तर नागरीकांनी स्वतः काढुन पोलीस विभागाला सहकार्य करावे. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असे पोलीस विभागाकडुन नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close