ईतर

संस्कार शिबिरातून मिळालेले संस्कार मुलांचे भविष्य घडवतात- प्रा. गजानन जाधव  

गुरुदेव सेवा मंडळ व ग्रामपंचायत श्रीरामपूर च्या वतीने आयोजित संस्कार शिबिरात मार्गदर्शन

पुसद : कुटुंब हे संस्काराचे मुख्य केंद्र आहे आपल्या कुटुंबातील आई वडील आजी आजोबा, शिक्षक यांना आपले मुलं सुसंस्कारित व्हावेत असे वाटते त्याही पलीकडे जाऊन विविध माध्यमातून आयोजित केलेल्या संस्कार शिबिरातून मिळालेले संस्कार हे विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनासाठी दिशादर्शक ठरतात त्यातूनच त्यांचे भविष्य घडते असे मत श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय पुसद येथील राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक प्रा. गजानन जाधव यांनी व्यक्त केले ते गुरुदेव सेवा मंडळ व ग्रामपंचायत कार्यालय श्रीरामपूर पुसद च्या वतीने आयोजित ग्राम जयंती उत्सवात संस्कार शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते

 

आयोजक जिल्हा सेवा अधिकारी गणेश रावजी धर्माळे यांच्या आयोजन व नियोजनातून गेल्या सतरा वर्षापासून सुरू असलेले निशुल्क स्वसंरक्षण संस्कार शिबिर व विवाह मेळावा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन करून सेवा अधिकारी गणेशराव धर्माळे व मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष प्रभाकर टेटर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले की आपले विचार बदला म्हणजे आपले भविष्य बदलेल कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपण समाजाच्या उपयोगी पडलो पाहिजेत हीच शिकवण या शिबिरातून मिळते. अशा पद्धतीने आयोजित केलेल्या संस्कार शिबिरात प्रत्येक पालकांनी आपला मुलगा किंवा मुलगी पाठवावी धर्माळे सर यांच्या समाज उपयोगी उपक्रमाबद्दल त्यांनी त्यांचे मनापासून अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता धर्माळे तर आभार गणेश राव धर्माळे यांनी मानले यावेळी शिबिरात मोठ्या संख्येने शिबिरार्थी उपस्थित होते त्यांच्या समवेत योगशिक्षक वर्षा हरणे, रंजना किनीकर यांची उपस्थिती होती. त्यानंतर मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष प्रभाकर टेटर पाटील यांच्याकडून वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close