Uncategorized

नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील तालुक्यात मोटार सायकली व मोटार पंप चोरी करणाऱ्या चोरट्यांना अटक ; स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पोलिसांना मोठे यश!

पुसद /प्रतिनिधी: यावतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदे तसेच मोटार सायकल व शेती अवजार तस्करी समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता (भा.पो. से) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हेशाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्थ पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सूचना दिल्या आहेत.

दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद येथील पोलीस अधिकारी व अंमलदार हे उमरखेड उपविभागात अवैध धंदे, पाहीजे असलेले आरोपीत शोध कामी उमरखेड हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान १६/०० वाजण्याचे सुमारांस मुखबिर व्दारे प्राप्त खात्रीशिर खबरे वरुन शेतातील पाण्याचे मोटार पंप चोरी संबंधाने उमरखेड हददीतील आरोपी क्र १) साजिद खान वाजिद खान रा. जामा मस्जिद वार्ड उमरखेड २) शेख उमेर शेख मुजीब रा. डॉ. जाकीर हुसेन वार्ड उमरखेड ३) मोहम्मद रेहान मोहम्मद रफिक रा. ताजपुरा उमरखेड यांनी चोरी केल्याचे माहीती मिळाल्याने तसेच ते तिघेजन अमोना डॅमचे रेस्ट हाऊसचे जवळ थांबलेले आहे अशा माहीती वरुन सदर ठिकाणी रवाना होवून सापळा रचून नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अतिशय शिताफिने त्यांना ताब्यात घेवून विचारपूस केली असता पोलीस स्टेशन उमरखेड अप क्रमांक २५/२०२६ कलम ३०३ (२) भान्यास हा गुन्हा ४) श्रीकांत ऊर्फ शेरा बालाजी सुर्यवंशी रा. माळसावरगांव ता. हदगांव नांदेड ५) विधीसंघर्षीत बालक असे मिळून आल्याने तसेच सदरचा मुद्देमाल हा हदगांव जिल्हा नांदेड येथील फरार आरोपी यांच्या मदतीने भंगार व्यवसायीक ६) शेख कादीर शेख ख्वांजा रा. रजानगर हदगांव ता. हदगांव जि. नांदेड यास विक्री केल्याचे कबूल करुन आरोपी क्रमांक ०१ ते ०४ तसेच विधीसंघर्षीत बालक असे यवतमाळ व नांदेड जिल्ह्यातील वेगवेगळे ठिकाणावरुन १३ मोटार सायकल चोरी केल्याचे कबूल करुन लपवून ठेवलेल्या १३ मोटार सायकल काढून दिल्या ते पोलीसांनी जप्त करुन ताब्यात घेतल्या आहेत. आरोपी कडून उघडकीस आलेले गुन्हे खालील प्रमाणे आहेत १) दराटी पोलीस स्टेशन अ.प.क्रं.२०/२०२६ कलम३०३(२)भान्यास हिरो पॅशन प्रो काळ्या रंगाची काळा व लाल पट्टा असलेली विना क्रमांक चेचीस नंबर MBLHAR181HHA71121 इंजन नंबरHA10ACHHA53646 २) पोलीस स्टेशन वणी अप क्रं.२६/२०२६ कलम ३०३(२)भान्यास वाहनाचे वर्णन हिरो काळ्या रंगाची स्प्लेंडर असलेली विना क्रमांक चेचिस क्रमांक MBLHA10BFFHC362 इंजन क्रमांक HA10ERFHC65991३)पोलीस स्टेशन हदगाव जि. नांदेड अप क्रं. २६/२०२६कलम ३०३(२) भान्यास वाहनाचे वर्णन हिरो होंडा स्प्लेंडर प्रो निळ्या व काळ्या रंगाची विना क्रमांक चेचिस क्रमांक MBLHA10ABCHA03914 इंजिन क्रमांक HA10EGCHA02648 ४) पो स्टे उमरखेड अप क्र. २५/२६ कलम ३०३ (२) भान्यास ऍग्रो कंपनीची ७.५ एचपी ची मोटर पंप जुनी वापरती ५)पो स्टे उमरखेड अप क्र.३०/२५ कलम ३०३ (२) भान्यास ट्रोलेक्स कंपनीची ३ हॉर्स पावर मोटर पंप जुनी वापरती ६)पो स्टे उमरखेड अप क्र. ३५९/२५ कलम ३०३ (२) भान्यास मोटर पंप व केबल जुनी वापरती ७)पो स्टे महागांव अप क्र. ५७/२५ कलम ३०३ (२) ६२ भान्यास जैन कंपनीचे १४ पाईप व स्पीक्लर तोटया ०८ जुनी वापरती ८)पो स्टे महागांव अप क. ५१४/२५ कलम ३०३ (२) भान्यास सौर ऊर्जा वरील मोटार पंप जुनी वापरती ९)पो स्टे महागांव अप क्र. ३८६/२५ कलम ३०३ (२) भान्यास शक्ती इंडिया कंपनीचे मोटर पंप जुने वापरती १०)पो स्टे महागांव अप क. ४५६/२५ कलम ३०३ (२) भान्यास५ एचपी ची विशाल कंपनीचा मोटर पंप तसेच स्टार्टर एक जैन कंपनीच्या आठ टोट्या ११)पो स्टे महागांव अप क्र. ५१३/२५ कलम ३०३ (२) भान्यास५ एचपी कंपनीचा मोटर पंप तसेच केबल जुनी वापरती १२)पो स्टे महागांव अप क्र. ५५५/२५ कलम ३०३ (२) भान्यास ईईकोजन कंपनीचा ५ एचपी चा मोटर पंप जुने वापरतीअशा प्रकारे नमूद आरोपी कडून १२ गुन्हे उघड एकूण ५,४१,०००/- रुचा मुददेमाल जप्त करुन नमूद आरोपी क्रमांक ०१ ते ०५ यांस पुढील कारवाई कामी पोलीस स्टेशन उमरखेड यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.सदरची कारवाई मा जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता (भा.पो. से) सा, मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात (म.पो. से) सा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड सा, मा. पोलीस निरीक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, शंकर पांचाळ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन उमरखेड यांचे मार्गदर्शनात सपोनि धिरज बांडे, पोउपनि शरद लोहकरे, पोउपनि रविंद्र शिरामे (चालक), सफो मुन्ना आडे, पोहवा संतोष भोरगे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा रमेश राठोड, पोहवा कुणाल मुंडोकार, पोशि सुनिल पंडागळे, पोशि राजेश जाधव सर्व नेम- स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close