ईतर

पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीने नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा!-शेतकरी नेते मनीष जाधव!

पुसद : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीच्या डोळ्यात देखत मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या मालाची लूट केली जात आहे. आणि मार्केट प्रशासनातील संचालक मंडळ धृतराष्ट्राचे सोंग घेऊन बसले आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांनी आपली नैतिक जबाबदारी समजून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड मध्ये वजन काट्यातील तफावत विसंगती प्रकरणात  शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेतकरी नेते मनीष जाधव यांच्या नेतृत्वात धडक देऊन आपल्या व्यथा शेतकऱ्याच्या प्रति संवेदनशील व कर्तव्यतत्पर लोकाभिमुख प्रशासन देणारे उपविभागीय अधिकारी आशिष बीजवल साहेब यांच्यासमोर मांडल्या पिढीत शेतकऱ्यांची बैठक लावून सर्व प्रश्न ऐकून घेतले

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व समस्यां व अडीअडचणीवर व शेतकऱ्यांच्या होणारी गैरसोईवर शेतकऱ्यांच्या सर्व सूचना व समस्या विषयी सविस्तर चर्चा यावेळी झाली शेतकऱ्यांनी प्रश्नाचा भडीमार करून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव मगर साहेब यांना निशब्द केले यांच्यावर कृषी उत्पन्न बाजार समिती पुसद मधील वजन काटे तफावत हा गंभीर प्रकार घडला असून यासाठी दोषी असलेल्या सर्व व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी एक मुखी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली.

या विषयी एस आय टी चौकशी नेमून निष्पक्ष चौकशीची मागणी शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केली या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला उत्तर देताना उपविभागीय अधिकारी यांनी जिल्हा अधिकारी यांच्याशी चर्चा करून चौकशी समिती नेमून चौकशी करण्याचे आश्वासन दिले उपरोक्त विषयावर दि,१६मे२०२६रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती यार्ड घाटोडीमध्ये १० क्विंटल ची तफावत आल्यानंतर पुसद विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ माजली ही घटना अत्यंत गंभीर असून या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबाबत शेतकरी आग्रही होते शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस साहेब , बाबासाहेब पाटील सहकार मंत्री , जयकुमार रावल पणन मंत्री संजय राठोड पालकमंत्री , इंद्रनील नाईक राज्यमंत्री जिल्हाधिकारी, यांच्या नावाने निवेदन करून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समस्या बाबत अवगत करून दिले व तात्काळ याबाबत उपाययोजना देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात या निवेदनात एकूण १९ मागणीचे निवेदन दिले आहे या निवेदनातील या खालील विधायक मागण्या करण्यात आलेले आहे१ ) टी .एम.सी. यार्ड घाटोडी येथील ४० टनी काटा याच्या दुरुस्ती तपासणी ही शेवटची कधी झाली हे अधिकृत वजन मापे काटा विभागाच्या माध्यमातून तपासणी अहवालात खुलासा देण्यात यावा२) अखेरची तपासणी कधी झाली वेळोवेळी या काट्याची तपासणी होते का ,? व दर्शनीय भागाला असलेला इंडिकेटर डिजिटल स्क्रीन मागील अनेक दिवसापासून बंद असल्याचे आढळले जे शेतकऱ्यांसाठी आपला वजन काटा किती आला सांख्यिकी आकडेवारी मध्ये पाहण्यासाठी ही व्यवस्था असते पण ती बंद आहे स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष का दिले नाही.३) भाजीपाला लिलाव मैदानात प्रचंड प्रमाणावर अस्वच्छता असून सामान्य नागरिकांच्या आरोग्याची दृष्टीने लोकांच्या जीवाशी खेळ चाललेला आहे याबाबत अनेकदा तक्रारी व माध्यमातूनही याच्या संबंधाने चर्चा झाली पण कायम कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे ४) शेतकऱ्यांच्या साठी शौचालय , मुत्रीघर याची प्रचंड दुरवस्था घाणीचे साम्राज्य असून याही कडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे५) येथे शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी व प्रतीक्षा कक्ष नसल्याने त्यांची प्रचंड गैरसोय होते६) शेतकऱ्यांच्या सर्व प्रकारच्या १००% कृषी उत्पन्नास खऱ्या अर्थान हमीभाव मिळवून द्यायचा असेल तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातच कृषी उत्पन्नाची किमान आधारभूत किमतीने (एमएसपी) खरेदी झाली पाहिजे याकरिता महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील कलम ३२ (घ) कलम ९४ (डी) (०१), (०२), (०३), कलम (०६), (०७) ची अंमलबजावणी करण्यात यावी.७) ज्या शेतकऱ्यांनी आपला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीमधे विकला आहे किंवा विक्री करणार आहेत, त्या प्रत्येक शेतकऱ्यांस राज्य सरकारद्वारा शिफारशीत व केंद्र सरकारद्वारा घोषित किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी भाव दिला गेला असेल त्या सर्व शेतकऱ्यांना शेतकरी हक्क मूल्य व भावांतर मूल्य फरकाची रक्कम शासनाकडून देण्यात यावी.८) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडत्याच्या माध्यमातून शेतमाल लिलाव झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या वाहतूक व्यवस्थेतून तीन – तीन किलोमीटर पर्यंत एमआयडीसीत त्या व्यापाऱ्याच्या गोडाऊन पर्यंत शेतमाल नेऊन खाली कराव लागतो या अधिकच्या वाहतूक खर्चाचा फटका शेतकऱ्यांवर येतो त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डातच बोलीत लिलाव लावणाऱ्या व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांचा शेतमाल खाली करण्यात यावा९) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून वजन काटा व इतर ग्रेडिंग साठी कुठलाही शुल्क आकारल्या जाऊन पठाणी वसुलीचा तगादा लावू नये१०) पावसाळ्यात शेतकऱ्यांना त्याचा शेतमाल पावसात भिजू नये यासाठी गोडाऊन व्यवस्था राखीव ठेवाव११ ) पणन कायद्यानुसार आडत बंद आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमाल लिलावामध्ये शेतकऱ्यांकडून अधिकची सक्तीची आडत वसूल करण्यात येऊ नये१२) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारा बाहेर होणारी अवैद्य खाजगी खेडा खरेदी पद्धतीने होणारी शेतमाल व्यवहार बंद करण्यात यावी१३) वजन मापे विभागाच्या माध्यमातून दर महिन्याला यांची वजन काटे तपासणी करण्यात यावी व या संबंधाने ते दर्शनीय फलकावर दर महिन्याला लावण्यात यावे तपासणी करत असताना शेतकऱ्याचा प्रतिनिधी या ठिकाणी हजर राहील याची तसदी घेण्यात यावी१४) लिलावात प्रक्रियेनंतर शेतमाल विक्री झाल्यानंतर शेतकऱ्यांना अडवून , न ठेवता त्याला त्याच्या शेतमालाचा योग्य तो मोबदला आडत दाराकडून तात्काळ अदा करण्यात यावा१५) पणन विभागाच्या व सहकार विभागाच्या अटी शर्तीच्या अधीन राहून शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्री व्यवस्थापनात कृषी उत्पन्न बाजार समितीने आदर्श आचारसंहितेचे व नियमांचे काटेकोरपणे प्रभावी अंमलबजावणी पालन करून शेतकऱ्यांना सहकार्य करावे यासाठी सहकार विभाग व पणन विभागाने या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यपद्धतीवर कटाक्षाने लक्ष ठेवून शेतकऱ्यांची होणारी गैरसोय टाळावी१६) शेतमाल विक्री झाल्यानंतर मार्केट यार्ड मध्येच शेतकऱ्यांची गाडीखाली व्हावी१७) काटा कार्यालयाच्या कक्षात सीसीटीव्ही आतून व बाहेरून बसविण्यात यावे१८) पावसाळ्यात भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची लिलाव प्रक्रियेत गैरसोय होऊ नये यासाठी शाश्वत व दीर्घकालीन प्रभावी उपाय योजना देण्यात यावे१९) बैल बाजार शेळी बाजारामध्ये पशुधनांना पिण्याच्या पाण्यासह इतर भौतिक सोयी सुविधा देण्यात यावे ,२०) दि,१६मे२०२५ ला घाटोडी मार्केट कमेटी यार्ड ला शेतमाल विक्री केलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या वजन काटामारी बाबत तक्रारीचे निरासरण करून त्यांना काट्यात आलेल्या विसंगत तफावत मोबदला देऊन दिलासा देण्यात यावा.

पुसद कृषी उत्पन्न बाजार समिती ही कुठल्या ना कुठल्या विषयाच्या अनुषंगाने कायम वादाच्या चर्चेत राहिली आहे या ठिकाणी सर्व व्यवहार हे पारदर्शक होऊन स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत शेतकऱ्यांचे कायम आक्षेप असतो अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून प्रशासनाने याची दक्षता घ्यावी घाटोडी येथील मार्केट यार्ड कमिटीतील काटामारी प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता गृह विभागाच्या माध्यमातून याची तात्काळ विना विलंब चौकशी करून शेतकऱ्यांना शोषणमुक्त पारदर्शक व्यवस्था या मार्केट कमिटी बाजार संस्थेतून देऊन शेतकऱ्यांच्या कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला योग्य बाजार भाव देऊन त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा देण्यात यावी वरील सर्व विषय हे निष्कर्षावरील असून अग्रेषित उचित कारवाई करून शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा या बैठकीला श्री मस्के साहेब सहकार तालुका अधिकारी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शिवाजीनगर सह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.शेतकरी नेते मनीष जाधव, अविनाश पोळकट, ज्येष्ठ शेतकरी नेते प्रेमराव सरगर तालुका अध्यक्ष विकास राठोड शेतकरी संघर्ष सेना सचिव धीरज पांडे आदित्य जाधव , सुनील जाधव , हिवळणी , शेषराव राठोड जय राठोड गोर सेना जिल्हाध्यक्ष विशाल पवार ब्राह्मणगाव निर्गुण राठोड सोनू पवार उमरी दीपक राऊत , पाळोदी , वैकुंल चंदूसिंग राठोड हरिभाऊ शिवाजी बांडे चंद्रभान उत्तम राऊत गजानन ठाकरे शेख फारूक भारत राऊत दिलीप राठोड काटखेडा सुदाम चिरगे यासह मोठ्या संख्येने यावेळेस शेतकरी या बैठकीला निवेदन करताना उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close