पुसद येथे संविधान दिन साजरा..

पुसद:;संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला.त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. या नियोजनाने आज दिनांक २६ नोव्हेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यकरण सहनियंत्रण समिती व रिपाइं आठवले यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आंबेडकर चौक येथे महामानव संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला समितीचे अध्यक्ष विठ्ठल खडसे, सचिव लक्ष्मण कांबळे, रिपाइं आठवले तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाठोरे यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून संविधान प्रस्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले यावेळी पुतळा समितीचे सदस्य दिनेश खांडेकर,दिनेश सावळे,अंबादास वानखेडे,राजेंद्र नाईक, प्रकाश धुळे,विनायक गुजर, भीमराव पठाडे,नितेश खंदारे,विशाल कांबळे,भास्कर बनसोड,विशाल पडघणे,संतोष आंभोरे,यादव हाटे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक वस्तीगृहाचे अधीक्षक विजय बहादुरे व असंख्य विद्यार्थी व समस्त समाज बांधव यांनी संविधान दिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला.



