सामाजिक

आठवणीतील नाना: पुसद येथे शोकसभा भावपूर्ण वातावरणात संपन्न; मान्यवरांकडून आठवणींना उजाळा

  • पुसद:येथील सप्तगिरी नगरमधील ‘श्री स्वामी समर्थ केंद्र’ येथे ज्येष्ठ अभिनेते व सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांना आदरांजली वाहण्यासाठी ‘आठवणीतील नाना’ जाहीर शोकसभा भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या सभेचे नाम फाउंडेशनच्या पुढाकारात आणि विविध सामाजिक व सेवाभावी संस्थांच्या वतीने संयुक्तपणे आयोजन करण्यात आले होते.
    • कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाम फाउंडेशनचे स्वप्नील देशमुख यांनी अत्यंत भावुक होत केले. त्यांनी पुसद परिसरात नाम फाउंडेशनच्या कार्याची माहिती देत दिवंगत नाना पाटेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. लोकांनी लोकांसाठी सुरू केलेली ही एक लोकचळवळ असल्याचे सांगत, प्रत्येकाने आता नाना आपल्यातच आहेत असे समजून दुष्काळ काळात काम करत राहणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे आवाहन त्यांनी केले.
    • याप्रसंगी माजी आमदार एड. निलय नाईक, भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, डिवायएसपी अमरसिंह मोहिते, नगराध्यक्ष एड. मोहिनी नाईक, संभाजी ब्रिगेडचे सुधीर देशमुख, काँग्रेसचे गटनेते डॉ. मोहम्मद नदीम यांनी दिवंगत नाना पाटेकर यांच्या चित्रपट सृष्टीसह सामाजिक कार्याचा गौरव केला. नानांच्या विचारांची अंमलबजावणी करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे विचार त्यांनी व्यक्त केले. सप्त खंजरी वादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य पंकज पाल महाराज यांनी अध्यात्मातून जीवनाचे सार सांगितले. मानवी जीवन क्षणभंगुर असले, तरी नाना पाटेकर यांनी आपल्या कर्मातून जीवन सार्थकी लावले; ते खऱ्या अर्थाने पुण्यात्मा होते, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
    • त्यानंतर राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक यशवंत देशमुख यांनी ज्ञानेश्वरीतील कर्मयोगाच्या विचारांचा संदर्भ दिला. मानवतेच्या कल्याणासाठी निरंतर कर्म करण्याचा आदर्श नाना पाटेकर यांच्या जीवनातून मिळतो, असे प्रतिपादन त् केले.
      कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषिभूषण दीपक आसेगावकर यांनी नाना पाटेकरांचे विचार केवळ ऐकून किंवा वाचून सोडून न देता, गरजु गरिबांना व संकटात सापडलेल्यांच्या मदतीला धावून जाणे आणि एक संवेदनशील माणूस म्हणून जगणे, हीच नानांच्या स्मृतींना आपल्या आचरणातून दिलेली खरी आदरांजली ठरेल असे विचार व्यक्त केले.सुरवातीला श्रीधर झरकर सर यांनी अभंग, भावगीत सादर केले. तसेच २मिनिट सामूहिक मौन श्रद्धांजली वाहण्यात आली.
      कार्यक्रमाचे नेटके संचालन ओमप्रकाश शिंदे यांनी केले तर आभार मोन्टू देशमुख यांनी मानले. या शोक सभेच्या आयोजनात नाम फाऊंडेशन, माणूसकीची भिंत सोशल फाऊंडेशन, पुसद पत्रकार संघ, मिशन ग्रीन संस्था, संवेदना सोशल फाऊंडेशन, श्री गुरुदेव सेवा मंडळ, वसुंधरा बहुउद्देशीय संस्था, रुग्ण मित्र फाऊंडेशन, निसर्ग संवाद, शांताई वृद्धाश्रम बेघर निवारा केंद्र, ज्येष्ठ नागरिक संघ, मराठा युवा मंच, गीताई केंद्र आणि मराठा सेवा संघ या संस्थांचा सक्रिय सहभाग होता. या सभेला पुसद शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close