पुसद येथील आदिवासी कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय आंध आदिवासी उपवर-वधू परीचय मेळावा ठरला सामाजिक एकजुटीचे प्रभावी व्यासपीठ; शंभरहून अधिक उपवर-वधूंनी दिला परिचय!

पुसद : येथील आदिवासी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य तालुका शाखा पुसदच्या वतीने जिजामाता मंगल कार्यालय, कारला रोड, येथे आयोजित करण्यात आलेला राज्यस्तरीय आंध आदिवासी उपवर-वधू परिचय मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या मेळाव्यामध्ये १०० पेक्षा अधिक उपवर-वधूंनी स्वतःचा परिचय दिला. या उपक्रमाला समाजबांधव, पालक, अधिकारी, कर्मचारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष मा.श्री. लक्ष्मण टारफे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. माधवरावजी वैद्य, माजी उपायुक्त, समाजकल्याण, पुणे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार माननीय उत्तमरावजी इंगळे साहेब, माजी आमदार माननीय संतोषरावजी टारफे साहेब, श्रीमती जनाबाई दुडुळे, (माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, नांदेड,) माननीय श्री. संभाजीराव सरकुंडे, (माजी राज्य माहिती आयुक्त, )माननीय डॉ. आरतीताई फुपाटे, (माजी अध्यक्षा, जिल्हा परिषद यवतमाळ, )माननीय श्री. तुकाराम भिसे, जिल्हा वित्त अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ, माननीय श्री. रमेश खारोडे, (गटविकास अधिकारी, पंचायत समिती आर्णी,) माननीय श्री. प्रकाश झळके, (उपअभियंता, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, वाशिम,) माननीय डॉ. हरिभाऊ फुपाटे, (माजी अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय पुसद,) माननीय डॉ. शिवाजी भुरके, (संजीवनी हॉस्पिटल पुसद,) माननीय डॉ. नामदेव सरकुंडे, तालुका आरोग्य अधिकारी पुसद, माननीय डॉ. गणेश वानोळे,( उपआयुक्त पशुसंवर्धन वाशिम,) माननीय श्री. प्रतीक दुम्हारे (उपविभागीय जलसंधारण अधिकारी, पुसद,) मा.राम लथाड (अतिरिक्त जिल्हाधिकारी) मा.प्रा.पंडित काळे अमरावती,माननीय श्री. सुरेश धनवे, (माजी जिल्हा परिषद सदस्य ) माननीय श्रीमती नेहा कबले ,(कृषी उपसंचालक) तसेच माननीय श्री. सूर्यभान बेले, (सहाय्यक विक्रीकर आयुक्त) आदी मान्यवर उपस्थित होते.
विशेष उपस्थितीमध्ये माननीय श्रीमती आशाताई पांडे, माजी सभापती पंचायत समिती पुसद, माननीय श्री. ज्ञानेश्वर तडसे, उपसभापती पंचायत समिती पुसद, माननीय श्री. प्रकाश शिकारे, बांधकाम सभापती, नगरपालिका उमरखेड आणि माननीय श्री. यादव डुडुळे, निरीक्षक तथा नायब तहसीलदार यांची उपस्थिती होती.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय माधवरावजी वैद्य, माजी आमदार उत्तमरावजी इंगळे, माजी आमदार संतोषरावजी टारफे माननीय संभाजीराव सरकुंडे, श्रीमती जनाबाई दुडुळे आणि डॉ. आरती फुपाटे यांनी आपल्या मनोगतातून या उपक्रमाचे महत्त्व विशद केले. अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजातील परस्पर संबंध दृढ होतात आणि समाजाच्या विकासाला चालना मिळते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
समाजाच्या एकजुटीतूनच संघटनशक्ती निर्माण होते लक्ष्मण टारफेअध्यक्षीय भाषणात लक्ष्मण टारफे यांनी सांगितले की, हा मेळावा केवळ विवाहयोग्य युवक-युवतींच्या परिचयाचा कार्यक्रम नसून समाजातील दोन कुटुंबे, विविध गावे आणि जिल्ह्यांना जोडणारे महत्त्वपूर्ण सामाजिक व्यासपीठ आहे. अशा उपक्रमांमुळे विवाह जुळविण्यासाठी लागणारा वेळ, पैसा आणि श्रम वाचण्यास मदत होते. तसेच अनावश्यक विवाह खर्च कमी होऊन सामान्य कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळू शकतो.
समाजातील युवक-युवतींना योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी संधी उपलब्ध करून देतानाच पालकांमध्ये परस्पर परिचय आणि विश्वास निर्माण करणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.समाजाच्या एकजुटीवर भर देताना ते म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकाने शिक्षण, रोजगार, आरोग्य, सामाजिक विकास आणि अन्यायाविरुद्धच्या लढ्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. समाज एकत्र आला तर संघटनशक्ती निर्माण होते आणि संघटित समाज कोणत्याही अन्यायाविरुद्ध प्रभावीपणे लढू शकतो.हा कार्यक्रम कोणत्याही राजकीय पक्षाच्या विचारधारेचा नसून संपूर्ण समाजाच्या हितासाठी आयोजित करण्यात आलेला सामाजिक उपक्रम आहे. राजकीय विचार वेगवेगळे असले तरी समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. समाजकारणाला प्राधान्य देऊन समाजाच्या हितासाठी सर्वांनी एकत्रित काम केले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.कर्मचारी संघटनेचा सामाजिक कार्याचा व्यापक दृष्टिकोन आदिवासी कर्मचारी संघटना ही केवळ कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सेवाविषयक प्रश्नांपुरती मर्यादित नसून समाजातील विद्यार्थी, बेरोजगार युवक, महिला, सामान्य नागरिक आणि संकटग्रस्त कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे. आजारी कर्मचारी, आर्थिक अडचणीत सापडलेले कुटुंब किंवा संकटग्रस्त समाजबांधव यांच्या पाठीशी उभे राहण्याची सामाजिक बांधिलकी संघटना जपत आहे.संघटनेचे कार्य केवळ सभासदांपुरते मर्यादित न ठेवता प्रत्येक कुटुंबातील घटकापर्यंत पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. कर्मचारी, अधिकारी आणि समाजबांधव यांच्यात सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील राहील, असे लक्ष्मण टारफे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल दुम्हारे, कु. वर्षा इंगळे मॅडम आणि कु. सुनंदा ढाकरे मॅडम यांनी केले प्रास्ताविक रामप्रसाद उघडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन चंद्रकांत मळघणे सर यांनी केले.
या मेळाव्यामुळे आंध आदिवासी समाजामध्ये सामाजिक एकोपा, परस्पर परिचय, विवाहविषयक जनजागृती आणि संघटनभावना वाढीस लागण्यास निश्चितच मदत होणार आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अशा विधायक आणि समाजोपयोगी उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.“संघटन शक्तीच समाजहिताचे संरक्षण, कर्मचाऱ्याचा सन्मान समाजाचा उत्थान!” या विचाराला केंद्रस्थानी ठेवून हा राज्यस्तरीय मेळावा यशस्वीरीत्या संपन्न झाला.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राज्य संघटनेचे पदाधिकारी दिनेश खेकाळे, मधुकर मोरझाडे, गजानन बेले, गंगाराम काळे, परमेश्वर मोरे, संजय बुरकुले, सुखदेव फोपसे, संजय चिरंगे, सुनंदा ठाकरे, दीपमाला व्यवहारे, पंजाब बेले, रामप्रसाद उघडे, संतोष डाखोरे, तेजस्वी इंगळे, मारुती घुक्से, अनिल दुम्हारे, विश्वनाथ रणमले, उद्धव धोंगडे, संतोष तडसे, संदीप ससाने, पवन सातपुते, काशिनाथ बोके, कैलास बोंबले, भगवान भोरकडे, सुरेश बोके, नारायण मुरमुरे, गजानन वंजारे, चंद्रकांत डहाके, गणेश फोपसे, चंद्रकांत मळघणे, शंकर माहुरे, नागोराव खोकले, पुंजाराम इंगळे, किसन ठाकरे, बाबुराव बोंबले, रामकृष्ण वाडगे, तुकाराम धनवे, संजय मोरे, गोविंद मस्के, बाळू पाचपुते, संजय भिसे, उज्वला पाचपुते, वर्षा इंगळे, सुनील वाडगे, नामदेव पिंपरे ,सतीश धनवे, साहेबराव मार्कड, गजानन जंगले, दादाराव टारफे, सदाशिव आमले, देवराव मुरमुरे, सदानंद लांबटोंगळे तसेच इतर कर्मचारी व समाजबांधवांनी मोलाचे सहकार्य केले.



