पुसद महावितरणचे कार्यकारी अभियंता जनार्दन चव्हाण हे चार लाखांची लाच घेताना रंगेहात एसीबीच्या ताब्यात !

पुसद :येथील महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन लालू चव्हाण यांना अँटी करप्शन ब्युरो (एसीबी)अमरावती कार्यालयाच्या वतीने शुक्रवारी रात्री चार लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे महावितरण विभागात खळबळ उडाली आहे.या लाच प्रकरणात अटक केलेल्या लोकसेवकांचे नाव जनार्दन लालू चव्हाण, वय ५७ वर्षे, व्यवसाय नोकरी पद कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, डिव्हिजन ऑफिस पुसद, वर्ग – १, रा. कार्यकारी अभियंता क्वार्टर, विद्युत भवन पुसद, जि. यवतमाळ, मूळ रा. स्वयंवर मंगल कार्यालया जवळ, सिंचन नगर, भावसार चौक, नांदेड असे आहे 
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार यांचे पुसद येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता लोकसेवक जनार्दन चव्हाण यांनी उपविभागाच्या अंतर्गत येणारे ब्रेकडाऊन व मेंटेनन्स चे एकूण वश२० लाख रुपये किमतीचे ९ वर्क ऑर्डर दिल्याने तसेच भविष्यात सदर बिलाची रक्कम मंजूर करून त्याचे देयक मिळवून देण्याकरिता २०% दराने चार लाख रुपये लाच मागणी संबंधित तक्रार करता कडून केली होती.त्यावेळी संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती ‘एसीबी’ कडे रितसर तक्रार केली. या तक्रारीची खातरजमा करण्यासाठी लाचलुचपत विभागाने पडताळणी करताना महावितरणचे कार्यकारी अभियंता चव्हाण यांना चार लाख रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले. ‘एसीबी’ ने नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला. सापळ्यादरम्यान चव्हाण यांनी लाचेची रक्कम स्वीकारताच अमरावतीच्या ‘एसीबी’ च्या पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईमुळे ‘महावितरण’ विभागात मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून, संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. आणि त्यानुसार संबंधितांविरुद्ध पुसद शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कलम७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस पोलीस अधीक्षक (अँटी करप्शन ब्युरो) बापू बांगर, पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक मंजुषा भोसले, पोनि. रविंद्र सहारे, पोनि संजय शिंदे, पोलिस अंमलदार अभय वाघ, वैभव जायले, मोहन ठाणेकर, वाहन चालक, राजेश बहिरट, उमेश बुजाडे, यांनी यशस्वीरित्या पार पाडले आहे.या सर्व घटनेमुळे पुसद शहरास कुठेतरी गालबोट बसत असल्याचे चित्र निर्माण होत असल्याचे सर्वसामान्य नागरिकांना वाटत आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरुध्द तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी खालील नमुद केल्याप्रमाणे संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.



