सामाजिक

संभाव्य पाणीटंचाईच्या नावाखाली स्थानिक प्रशासनाने जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना वेठीस धरले ; शेतकऱ्यांनी केले रस्ता रोको आंदोलन!

पुसद: यंदा एल निनोमुळे शेतकऱ्यावर दुष्काळाचे मोठे संकट आले आहे. खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर नुकसान शेतकरी हवलदिल झाला आहे. आता रब्बी हंगामातील पेरण्यांवरील याचा परिणाम होताना दिसून येत आहे.त्यामुळे पुस धरणाचे आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी तसेच सामाजिक संघटनांनी पुसद- नागपूर मार्गावरील फार्मशी जवळील रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे.पंरतु स्थानिक लोक प्रतिनिधी प्रशासन संभाव्य पाणीटंचाईच्या नावाखाली जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना वेठीस धरत असल्याचा आरोप केला आहे.त्यामुळे “शेतकरी कारखानदार झाला पाहिजे, तर शेतकऱ्यांची लेकरं सुद्धा कलेक्टर झाली पाहिजेत” ज्यातून ग्रामीण व कृषी समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीचा पाया रचला गेला असे माजी मुख्यमंत्री  वसंतरावजी नाईक साहेब  त्यांच्याच मातीतील शेतकऱ्यांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते हे मात्र या मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी शोकांतिका आहे.तरीही संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधींनी धृतराष्ट्राचे सोंग घेतले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

यंदा एल निनोमुळे शेतकऱ्यावर दुष्काळाचे मोठे संकट आले आहे. खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर नुकसान शेतकरी हवलदिल झाला आहे. आता रब्बी हंगामातील पेरण्यांवरील याचा परिणाम होताना दिसून येत आहे. आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी ओल्या, तर कधी सुक्या दुष्काळामुळे शेती पिकावर मोठा परिणाम होताना दिसत आहे. तर शेतमालाला योग्य दर न मिळाल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट बनली आहे. यावर्षी तर हातातोंडाशी आलेला खरीप पीक अवकाळी पावसाने हिरावून घेतला. तरीही हार न मानता आता रब्बी हंगामात काहीतरी चांगले पदरात पडेल, अशी आस बाळगून शेतकरी नव्या उमेदीने यंदाच्या रब्बी हंगामाच्या तयारीला लागला होता मात्र पुसद विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्याची अपरिहार्यता निर्माण व्हावी यापेक्षा दुर्दैवी बाब नाही३०२६-२७ खरीप हंगामातील तुर, कापूस,हळद, ऊस, फळबाग, करपत नसून शेतकऱ्याचे स्वप्न करपत आहेत

आता तोंडाशी आलेल्या घास हिरावून घेतला जात आहे. परंतु स्थानिक प्रशासन संभाव्य पाणीटंचाईच्या नावाखाली जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना वेठीस धरत असून सध्या पूस धरणात पाणीसाठा मुबलक असताना सुद्धा पंधरा दिवसापासून शेतकरी या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी पाटबंधारे उपविभागीय अधिकारी दंडाधिकारी यांच्याकडे मागणी करत आहेत परंतु संबंधित प्रशासन जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पुस धरणाचे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी कोणताही राजकीय हस्तक्षेप न होता प्रशासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात आली असून शेतकऱ्यांनी चक्कर रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे.

शेतकऱ्याचे आराध्य दैवत वसंतराव नाईक यांच्या स्वप्नपूर्तीसाठी संबंधित लोकप्रतिनिधींनी व संबंधित प्रशासनाने कामे करावे व तात्काळ पाण्याचा आवडतं गुराधनारांसह शेतकऱ्यांच्या शेतातील पिके करपत असलेल्या पिकासाठी सोडावे तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील वीज बंद करू नये २०२६-२७ या आर्थिक वर्षातील पिक विमा व सोयाबीनला एक लाख तसेच कापसाला दीड लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी शेतमजुरांना देखील २५ हजार रुपये अनुदान देण्यात यावे अशा विविध मागण्या करण्यात आले आहे. या आंदोलनात सर्वपक्षीय सामाजिक संघटना शेतकरी संघटना शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव स्वाभिमानी शेतकरी संघटना राजूभाऊ दुधे, माजी पाणीपुरवठा सभापती नगर परिषद पुसद अभय गडम माजी नगरसेवक, अरुण जाधव, विकास राठोड, अविनाश गायकवाड प्रगतशील शेतकरी , प्रेम राव सरगर दिलीप बेद्रे , रुपेश जाधव, माधव पडघणे किशोर राठोड काटखेडा दीपक गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते यावेळी पाटबंधारे उपविभागीय अधिकारी अमोल जाधव व शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार क्षीरसागर साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता काही वेळेसाठी वाहतूक व्यवस्था कोलमडली होती मात्र आंदोलन मागे घेताच वाहतूक पोलीस वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close