वालतूर तांबडे शाळेच्या मुला -मुलींची जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी

पुसद : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ व १३ऑक्टोबर २०२६ रोजी अभ्यंकर कन्या शाळा , यवतमाळ येथे जिल्हा स्तरीय शालेय खो खो स्पर्धा पार पडल्या.या स्पर्धेत अंडर-१४ मुला-मुलींच्या वयोगटात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा, वालतूर तांबडे येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट व नेत्रदीपक कामगिरी करत खो खो क्रीडा प्रकारांत यश संपादन केले. विशेष म्हणजे मागील वर्षी सुद्धा जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत दोन्ही संघ विजयी होऊन विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. यावर्षी सुद्धा दोन्ही संघाने प्रथम क्रमांक मिळवून विभागीय शालेय खो खो स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली.
या यशाबद्दल शाळेतील सर्व यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या मेहनतीला शाळेचे मुख्याध्यापक व क्रीडा मार्गदर्शक मधुकर मोरझडे तसेच शिक्षकवृंदाचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी खेळाडूंचे गटशिक्षणाधिकारी धीरज आडे, विस्तार अधिकारी विश्रांती फोपसे,उमेश वाघमारे, अमित बोजेवार, शितलकुमार वानखडे, केंद्रसमन्वयक प्रल्हाद जाधव, यशवंत अघम , शाळेचे शिक्षक विकास वाकडे, जयसिंग चव्हाण, किशोर दांदडे, सागर राऊत, विक्रम राठोड, प्रफुल्ल पांडे ,आलासिंग राठोड, बिबीषण राठोड, चंदूसिंग राठोड, नेमीचंद राठोड, राजू पवार, युवराज राठोड, दिलीप जाधव, परमानंद राठोड, सदानंद राठोड, बलदेव राठोड, रविराज राठोड, केवल भिसे, प्रकाश चिरंगे , राहुल जाधव, संतोष तांबारे,संतोष इंगोले,गजानन हमाने, चंदल पवार, निलेश राठोड, सुधाकर जाधव तसेच वालतूर तांबडे येथील सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.विभागीय खो खो स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे वालतूर तांबडे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.



