गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी डीजेच्या ध्वनी प्रदूषणावर ग्रामीण पोलिसांचा बडगा ; नियमभंग करणाऱ्या दोन डीजे चालकांसह मालकांवर कारवाई!
नियम मोडल्यास खैर नाही; पोलिसांची डीजेचालकांना तंबी!

पुसद : ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून कानठळ्या बसवणारा आवाज लावणाऱ्या डीजेचालक आणि मालकांना ग्रामीण पोलिस प्रशासनाने सक्त तंबी दिली आहे. धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली दुसऱ्याच्या शांततेचा, आरोग्याचा आणि जगण्याच्या अधिकारावर अतिक्रमण करता येणार नाही,डीजेच्या कर्णकर्कश मोठ्या आवाजामुळे यांचे थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याने यामध्ये हृदयविकाराचे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, शरीरात ताण निर्माण होतो आणि त्याचा परिणाम हृदय, रक्तदाब, झोप, मानसिक आरोग्य तसेच एकाग्रतेवर होऊ शकतो. आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेले नागरिक आणि मानसिकदृष्ट्या संवेदनशील व्यक्ती यांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे या गणेशोत्सवाचा उत्साह कायम ठेवताना डिजे बंदीचे नियम पाळणे आवश्यक आहे.जर या नियमांचे उल्लंघन केल्यास थेट कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा कडक इशारा पुसद ग्रामीण पोलिसांनी दिला असून नियम मोडणाऱ्या वर कारवाई करण्यात आली आहे. 
याबाबत पुसद ग्रामीण पोलिसांच्या सूत्रांनी ‘झेप न्यूज’ ला दिलेली माहिती अशी की,पुसद ग्रामिण पोलीस स्टेशनच्या हद्दीत दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गणेश स्थापना होत असल्याने या उत्सवासंबंधाने मंडळचे अध्यक्ष व पदाधिका-यांना नियमांचे पालन करण्याबाबत व डी. जे. वर पुर्णपणे बंदी असल्यामुळे डी. जे न लावण्याबाबत तसेच जे कुणीही नियमांचे पालन करणार नाही. त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. असे पोलिस प्रशानाकडून मंडळांना आवाहन करण्यात आले होते. तरी दि. १४सप्टेबंर२०२६ रोजी पोलिस पेट्रोलींग करीत असतांना सांयकाळी ०७/०० वाजण्याच्या सुमारास ग्राम पारवा ता. पुसद कडे वाहन क्रं.एम एच ३०बिडी०८४८ या कंमाकांचे वाहनात बदल करून डी.जे. चे बॉक्स असे साहीत्य लावून वाहनाचा चालक मालक नामे रूषीकेश लक्ष्मण धवसे वय २० वर्ष, रा. वनवार्ला, ता. पुसद तसेच ग्राम कारोळ, ता. पुसद कडे वाहन कं. एम एच २०एआय३०९५ या क्रंमाकांचे टाटा वाहनात बदल करून डी.जे. चे बॉक्स असे साहीत्य लावून वाहनाचा चालक / मालक नामे अंगद गोविंद राठोड वय ३२ वर्ष, रा. शिवणी ता. मानोरा जि. वाशिम असे जांताना मिळून आले पोलीस प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन न करता उल्लघंन करीत असतांना मिळून आल्याने त्या वाहनाचे मूळ कागदपत्रे दाखविण्यासंबंधी विचारपूस केली असता त्यांनी कागदपत्रे सादर केली नाही. त्यावरून दोन्ही वाहनांस ताब्यात घेवून कार्यवाही करण्यात आली.सदरची कार्यवाही मा. जिल्हा पोलीस अधिक्षक यवतमाळ कुमार चिंता सा.मा. अप्पर पोलीस अधिक्षक यवतमाळ अशोक थोरात सा.. यांचे मार्गदर्शनात तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, पुसद अमर मोहीते साहेब यांच्या नेतृत्वात ठाणेदार आशिष चौधरी, पोउपनि रवि चव्हाण, पोउपनि शेख जब्बार, पोहेका / ९२७ विजय चव्हाण, पोहेकॉ रविंद्र गावंडे, दिनेश आडे, पोना / रामदास इंगळे पो. स्टे. पुसद ग्रामिण यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.तसेच पोलिस प्रशासनाच्या वतीने सर्वाना आव्हान करण्यात येते की, मा. सर्वोच्च न्यायालय तसेच उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार डी.जे. तसेच बॅन्जो व ईतर कर्णकर्कश वाद्य वाजविण्यास बंदी असल्याने गणेश भाविकांनी गणेश उत्सव साजरी करतांना डी. जे अथवा बॅन्जो वाजविल्यास त्याचेवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.



