क्राइम

अवैधरित्या देशीकट्टा बाळगणाऱ्या दोन तरुणांना अटक; वसंत नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे यांनी स्टेशनचा कारभार कारभार सांभाळताच मोठी कारवाई!

पुसद : शहरातील वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधरित्या गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोन तरुणांना वसंत नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे यांनी पोलीस स्टेशनचा कारभार सांभाळताच पहिली मोठी कारवाई करून दोन आरोपींना अटक केली आहे.हि कारवाई शुक्रवारी दुपारी १२:३०वाजण्याच्या सुमारास पुसद-वाशीम रस्त्यावरील महिंद्रा ट्रॅक्टर च्या शोरूम जवळ करण्यात आली.

याबाबत वसंत नगर पोलीस स्टेशनच्या सुत्रांनी ‘झेप न्यूज’ ला दिलेली माहिती अशी की,दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजीचे १२.३० वा चे सुमारास मा. सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब पुसद यांचे पथकांना गोपनिय बातमीदारामार्फत खबर मिळाली होती की, पुसद ते वाशिम जाणारे रसत्यावर दोन तरुण हे मोटारसायकलवर पिस्टल बाळगुन फिरत आहेत. या खात्रीशीर माहिती वरून तात्काळ वसंतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे यांनी पोलीस स्टेशनचा कारभार सांभाळताच त्यांच्या अधिकार क्षेत्रातील पोलीसांनी व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने सयुक्तरित्या महिन्द्रा टॅक्टरच्या शोरूम समोर जवळ जावुन मोठ्या शिताफीने दोन तरुणांना मोटारसायकलने पुसद शहराकडे येत असल्याचे दिसले त्यावेळी पोलीसांनी त्यांना थांबवुन त्यांची विचारपूस करीत त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) गजानन इंगोले वय २३ वर्ष रा शिवाजी वॉर्ड पुसद २) आदिनाथ संतोष पुलाते वय २२ वर्ष रा मांडवा ता.पुसद हा असे सांगीतले त्यावेळी पोलिसांनी तात्काळ आदिनाथ संतोष पूलाते याचे अंगझडती घेतली असता त्याच्याकडुन एक सिल्वर रंगाचे जुना वापरता देशी बनावटीचा पिस्टल (कट्टा), व त्यांच्या ताब्यातील दुचाकी मोटर सायकल असा एकूण असा ४५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले.या आरोपी विरूध्द वसंत नगर पो.स्टे ला अप.न. ९०/२०२६ कलम ३/२५ भारतीय हत्यार कायदया, सहकलम ३(५) भा. त्या.स.अन्वये गुन्हा नोंद करून या आरोपींनी अवैधरित्या देशीकट्टा बाळगणाऱ्या दोन तरुणांना अटक केली आहे. ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधिक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक थोरात सहा पोलीस अधिक्षक हर्षवर्धन बि. जे वसंत नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे, यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि शिवानंद स्वामी, सुरेश राठोड, सफौ अरून जाधव पोहेका ३०२ चव्हाण, सो पोका २८१ चव्हाण, पोका ५०८ नरवाडे पोकाँ २६८९ लोखंडे, पोकों ७०४ गिरनारे, पोका १३१२ इरफान, मपोशि १४२० रखडे यांनी पार पाडली असुन गुन्ह्यांचा पुढील तपास पोउपनि शिवानंद स्वामी हे करीत आहेतत्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे नेमके कोठे जाऊन मिळतात कां.? याचा तपास देखील पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close