श्री संत सेवालाल महाराज जयंतीच्या शोभायात्रेला नाईक कुटुंबाने विरोध दर्शविल्या प्रकरणी राज्यमंत्री इंद्रनील नाईकां विरुद्ध बंजारा समाजातील तरुण संतप्त; तर नाईक कुटुंबाची बदनामी कदाचित खपून घेणार नाही विविध संघटनाचा पत्रकार परिषदेत सुर!

पुसद: शहरात बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेले संत सेवालाल महाराज यांची जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्याच्या करणावरून राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि त्यांच्या पत्नी नगराध्यक्षा सौ.मोहिनीताई नाईक यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याने ‘सुतक’ पाळत असल्याचे कारण देत समाजातील तरुणांना जयंती साजरी न करण्याचा सल्ला दिल्याच्या कारणावरून बंजारा समाजातील तरुण पिढीच्या तरुणांमध्ये पहिली ठिणगी पडली..वाद विकोपाला गेला? यासंदर्भात सोशल मीडियावर व समाज माध्यमावर हे तरुण नाईक कुटुंबाबद्दल संतप्त प्रतिक्रिया देऊ लागले तर दुसरीकडे या समाजातील काही सुशिक्षित तरुणांनी राज्यमंत्री इंद्रनील नाईक व त्यांच्या पत्नी सौ मोहिनी ताई नाईक यांनी समाजाची माफी मागावी अशा आशियाचे निवेदन दिले परंतु नाईक कुटुंबानी या तरुणाच्या मागणीची दखल घेतली नाही उलट विरोध दर्शविणाऱ्या तरुणांमध्ये फूट पाडून त्यांचे मनोबल खचवले जाऊ लागले.
त्याच अनुषंगाने आज दि.२८ फेब्रुवारी २०२६ रोजी जसे चंदनाच्या झाडावर वाढणारे बांडगुळ,परोपजीवी वनस्पती आहे त्या चंदनाच्या फांद्यांवर राहून पाणी आणि पोषक तत्वे शोषून घेतात तसेच सत्तेच्या नेहमी सानिध्यात राहणाऱ्या विविध संघटनांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते त्यावेळी ना. इंद्रनिल नाईक व सौ. मोहिनी नाईक यांची बदनामी समाज कदापी खपवून घेणार नाही असे पत्रकार बांधवापुढे पाढे वाचण्यास सुरुवात केली. नाईक परिवार दुःखात असल्याने त्यांनी संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीबाबत स्वतः पुढाकार घेतला नाही. मात्र ना. इंद्रनिल नाईक व नगराध्यक्षा सौ. मोहिनीताई नाईक यांनी १५ फेब्रुवारीला ५ ठिकाणी कार्यक्रमात हजेरी लावली होती परंतु नाईक कुटुंबाने जयंती साजरी केली हे मन्या तरुणाची चुकीची आहे.व जयंती न झाल्याबद्दल ना. इंद्रनिल नाईक व मोहिनीताई नाईक यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा आम्ही निषेध करु असे प्रिंट मीडिया व ईलेक्ट्रानिक मीडियावर बातम्या पासून लागल्यामुळे समाजातील तिथे हजर असलेल्या संघटनांच्या पदाधिकाऱ्याचे म्हणने होते मोहिनी नाईक यांनी जयंतीला विरोध केला नाही. उलट ना. इंद्रनिल नाईक व मोहिनी नाईक यांनी सहभाग नोंदविला. दरवर्षी सुध्दा नाईक घराणे स्वतः जयंती साजरी करीत नाहीत. ते सहभाग नोंदवितात, वर्गणी देतात. परंतु राजकीय स्वार्थासाठी समाजातील काही महाभाग तरुणांनी नाईक घराण्याला बदनाम करण्याचा कट रचला असून तो समाज माध्यमा मार्फत नाईक परिवाराची बदनामी सुरू असल्यामुळे बंजारा समाज हे कदापी खपवून घेणार नाही असे संघटनांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. या प्रसंगी सौ. संगिता जाधव, यांनी तर आपले विचार व्यक्त करताना सांगितले की या तरुणांवर कायदेशीर रित्या कारवाई करून मानहानीचा दावा सुद्ध केल्या जाईल प्रा. उल्हास चव्हाण व राजाराम राठोड यांनी आपले विचार मांडले. प्रारंभी प्रा. संजय चव्हाण यांनी संचालन करीत असतांना बंजारा समाजात जो जयंती वरुन गैरसमज झालेला आहे तो दूर करण्यासाठी आजची बैठक असल्याचे सांगितले. संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी केली जाते. परंतु समाज माध्यमावर गैरसमज काही युवकांनी पसरविला जात आहे. त्यामुळे या प्रकरणात ना. इंद्रनिल नाईक व सौ. मोहिनी नाईक यांना माफी मागण्याची गरज नाही.
परंतु त्याचे वेळी एका महाभाग प्राध्यापकांनी अकलेचे तारे तोडून पत्रकारांवरच तिन ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्या समाजातील सुशिक्षित तरुणांना समजाविण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांच्या मागे कोणती मोठी शक्ती आहे आणि ती नाईक कुटुंबाला बदनाम करण्याचा राजकारण करत आहे असल्याचा डाव आखल्याचा आरोप करीत राज्यमंत्र्याचा पाईक असल्याचा आव आणला होता परंतु त्यावेळी पत्रकार बांधवांनी प्रश्नाची भडीमार करताच पत्रकार परिषदेमध्ये एकच कल्लोळ उडाला आणि पत्रकारांनी या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा सुद्धा प्रयत्न केला परंतु आयोजकांनी पत्रकार बांधवाची माफी मागून चुकी झाल्याचे कबूल केले. परंतु या प्रकरणाची पहिली ठिणगी कुठे पडली.. आणि हा वाद कोणी व कसा विकोपाला नेला. याचा सूत्रधार कोण? या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरीत राहिले या प्रकरणाला वेगळे वळण देणारा सूत्रधार १३ फेब्रुवारी पासून कोणाच्या संपर्कात होता हे मात्र संशोधनाचा विषय असून एका व्यक्तीमुळे ही संपूर्ण पत्रकार परिषद बारगळली हे मात्र विषेश आहे.
परंतु बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांच्या जयंती साजरी करण्यावरून पुसद मध्ये मोठा वाद पेटला असला तरीही समाजाच्या तरुणांना गटात गटात विभागून काही समाजातीलच महाभाग बांडगुळ या समाजातील तरुणाचा बळी घेत असल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे. परंतु या जयंतीच्या कार्यक्रमाला आम्ही सर्व समाज घटक जबाबदार असुन पुढील वर्षी मोठ्या स्वरुपात जयंती साजरी करु. परंतु चरित्रहनन करण्याचा कोणीही प्रयत्न करु नये असे स्पष्टीकरण प्रा. संजय चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविकात केले.तर आभार श्रीराम पवार यांनी मानले.परंतु अखेर ही पत्रकार परिषद बारगळली..



