म्युल अकाउंट सायबर फसवणूक प्रकरणी दोघांना अटक; उमरखेड पोलिसांची प्रशंसनीय कामगिरी!

उमरखेड/ प्रतिनिधी:‘म्युल अकाउंट’चा वापर करून नागरिकांची लाखो रुपयांची सायबर फसवणूक केल्याप्रकरणी उमरखेड पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.तपासात उमरखेड तालुक्यातील मौजे ब्राह्मणगाव येथीलबँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेतील एका खात्याचा वापर सायबर फसवणुकीतील रक्कम स्वीकारण्यासाठी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
याबाबत पोलीस सूत्रांनी ‘झेप न्यूज’ ला दिलेली माहिती अशी की,यवतमाळ जिल्ह्यांत मागील काही दिवसांपासून म्युल अकाउंटचा वापर करून होणा-या सायबर फ्रॉड गुन्हांना आळा घालण्यासाठी सायबर पोलीस यवतमाळ यांचे नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबविली जात असुन जिल्ह्यात आता पर्यंत आशा प्रकारे सायबर फसवणूक व इतर घोटाळे यांसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रितीने आपले आकाउंट वापरण्यास देणा-या अनेक आरोपींवर कारवाई झाल्या आहेत व चालू आहेत. त्याचाच भाग म्हणून जिल्हा पोलीस अधिक्षक साहेब यवतमाळ यांचे आदेशाने उमरखेड ठाणेदार पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ साहेब यांचे नेतृत्वात व सायबर टीम यवतमाळ यांच्या देखरेखेखाली पडताळणी करत असतांना उमरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे ब्राम्हणगांव येथील बँक ऑफ महाराष्ट्र मधील खाते नंबर – ६०२७६४०१५५७ व ६०५४१४४९००० हे दोन्ही म्युल अकाउंट असल्याचे व ते अनुकमे अभिजित आनंदराव राणे वय. २२ वर्ष, व शुभम शिवाजी राणे वय. २५ वर्ष दोन्ही रा. दिगडी ता. उमरखेड यांचे नावे असल्याचे व सदर दोन्ही अकाउंट वरून आतापर्यंत अनुक्रमे ४,७४,०००/- रू व ७,८७,६५२/- रू. संशयास्पद / अवैध्य रक्कम लोकांची फसवणूक करून जमा झालेली असुन ती नंतर वेगवेगळया अकाउंट वर यु.पी. आय व इतर ऑनलाईन स्वरूपात हस्तांतरीत केल्याचे दिसून येत असल्याने व सदर खात्या विरूध्द आतापर्यंत अनेक तकारी नोंद झाल्या असल्याने यावरून उमरखेड पो. स्टे. अनुकमे अपराध क्र. ६९३/२०२६ व ६९०/२०२६ कलम ३१८ (४) व इतर बी.एन.एस. तसेच कलम ६६ (सी) व इतर आय.टी. ॲक्ट २००० अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असुन यामध्ये आरोपी नामे शुभम शिवाजी राणे वय. २५ वर्ष रा. दिगडी ता. उमरखेड यांस यापुर्वी अटक करण्यात आले असून सध्या तो एम.सी. आर मध्ये असुन आरोपी नामे अभिजित आनंदराव राणे वय २२ वर्ष हा सध्या पी.सी.आर. मध्ये असुन दोन्ही गुन्हयांचा तपास चालू आहे.’म्युल अकाउंट अनुषंगाने उमरखेड पोलीस स्टेशन ठाणेदार शंकर पांचाळ यांचेकडून उमरखेड तालुक्यातील जनतेला अवाहन करण्यात येत आहे की, कोणीही व्यक्तीने कोणत्याही अमिषाला बळी पडू नये व प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रितीने आपले आकाउंट किंवा कागदपत्र कोणत्याही व्यक्तीला देवु नये सदर अकॉउटचा वापर सर्रासपणे सायबर फ्रॉड, इतर अर्थिक फ्रॉड, क्रिप्टो करन्सी ग्रान्स्पर फ्रॉड व शेअर मार्केट फ्रॉड अशा अनेक ठिकाणी झाल्याने ज्या व्यक्तीच्या नावे अकाउंट आहे ती व्यक्ती यामध्ये आरोपी बनते तरी सर्व नागरिकांनी जागरूक व्हा, आपल्या पाल्यांना, शेजा यांना जागरूक करा व अशा फ्रॉड मध्ये स्वतः भागिदार होण्यापासून वाचवा असे अहवान करण्यात येत आहे.
सदरची कारवाई जिल्हा कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. अशोक थोरात अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. अमर मोहीते उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद विभाग अतिरीक्त कार्यभार उमरखेड उपविभाग, मा. शंकर पांचाळ पोलीस निरीक्षक उमरखेड पो. स्टे, यशोधरा मुनेश्वर पोलीस निरीक्षक सायबर पो. स्टे. यांचे मार्गदर्शनाखाली डी.बी. प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, पोलीस उपनिरीक्षक योगेश जाधव, सहा. फौजदार विजय पतंगे, पो. हवा. चंदन जाधव, पो. हवा. नरेंद्र पुंड, पो. हवा. आतुल तागडे, पो. हवा. संतोष राठोड, पो. कॉ. संघशिल टेंभरे, पो. कॉ. अमित नोळे, पो.कॉ. विष्णू राठोड, पो. कॉ. दिगांबर गिते, पो.कॉ. निवृत्ती महाळनवर सर्व उमरखेड पोलीस स्टेशन यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.



