सामाजिक कार्यकर्त्या वृषालीताईं वाडत्या यांच्या वाढदिवसानिमित्त वसंत नेत्रालय व तथागत मंडळाच्या वतीने वरुड येथे प्रेरणादायी उपक्रम; ७५०गरजू रुग्णांची मोफत नेत्र तपासणी व औषधोपचार!

पुसद : तालुक्यातील वरुड येथे सामाजिक कार्यकर्त्या वृषालीताईं वाडत्या यांच्या वाढदिवसानिमित्त वसंत नेत्रालय व तथागत मंडळाच्या वतीने वरुड येथे संयुक्तरीत्या प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला या मोफत नेत्र तपासणी सामाजिक उपक्रमात जवळपास ७५०गरजू रुग्णांची मोफत नेत्र तपासणी व औषधोपचार करण्यात आला.
वाढदिवस हा केवळ वैयक्तिक आनंदाचा दिवस न राहता तो समाजसेवेचा, मानवतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा उत्सव ठरू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे वृषाली ताई यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर.
वृषाली ताई यांच्या वाढदिवसानिमित्त वसंत नेत्रालय, पुसद तथा तथागत मंडळ, वरूड यांच्या संयुक्त विद्यमाने वरूड येथे भव्य मोफत नेत्र तपासणी, निदान, औषधोपचार व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात सामाजिक बांधिलकीचा उत्कृष्ट संदेश देत आरोग्यसेवेचा दीप प्रज्वलित करण्यात आला.
या शिबिरात परिसरातील तब्बल सुमारे ७५० रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. अनुभवी नेत्रतज्ज्ञांनी रुग्णांची सखोल तपासणी करून विविध नेत्रविकारांचे निदान केले. गरजेनुसार रुग्णांना तात्काळ मोफत औषधोपचार देण्यात आले. तसेच ज्यांना चष्म्याची आवश्यकता होती अशा निवडक गरजू रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. या शिबिरात एकूण ४०० रुग्णांना मोफत चष्मे देण्यात आले. तसेच १२० मोतिबिंदू रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली.
या संपूर्ण शिबिराचे वैद्यकीय नेतृत्व डॉ. रामचंद्र राठोड (MS Eye Surgeon, वसंत नेत्रालय, पुसद) यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तपासणी प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध व प्रभावीपणे पार पडली. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा सहज उपलब्ध व्हावी, आर्थिक अडचणींमुळे कोणताही रुग्ण उपचारांपासून वंचित राहू नये, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
वृ या प्रसंगी डॉ. रामचंद्र राठोड यांनी सांगितले की, “अशा सामाजिक उपक्रमांमुळे आरोग्यसेवा अधिक लोकाभिमुख होते आणि गरजू रुग्णांपर्यंत योग्य उपचार पोहोचतात.”शिबिराला परिसरातील नागरिकांचा प्रचंड व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. वृषाली ताई यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या आरोग्यसेवा उपक्रमामुळे समाजात “सेवेतून समाधान” हा प्रेरणादायी संदेश पोहोचला.या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वसंत नेत्रालयाच्या वैद्यकीय पथकासह तथागत मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.या उपक्रमांमुळे आरोग्यसेवा अधिक लोकाभिमुख होते आणि गरजू रुग्णांपर्यंत योग्य उपचार पोहोचतात.”शिबिराला परिसरातील नागरिकांचा प्रचंड व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. वृषाली ताई यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या आरोग्यसेवा उपक्रमामुळे समाजात “सेवेतून समाधान” हा प्रेरणादायी संदेश पोहोचला.या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वसंत नेत्रालयाच्या वैद्यकीय पथकासह तथागत मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.
वसंत नेत्रालय, पुसद या आरोग्यसेवा उपक्रमामुळे समाजात “सेवेतून समाधान” हा प्रेरणादायी संदेश पोहोचला.या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वसंत नेत्रालयाच्या वैद्यकीय पथकासह तथागत मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.— डॉ. रामचंद्र राठोड MS Eye Surgeon
वसंत नेत्रालय, पुसद



