पुसद शहरातील एका लॉजवर पोलिसांची मोठी कारवाई, पाचशेच्या बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, तेलंगणा कनेक्शन समोर!
पुसद शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना...

पुसद: शहरातील विहार लॉज मधील रुम नं.१०५ येथे शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे,५०० रुपयाच्या बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला असून, या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये तेलंगा कनेक्शन समोर आले या घटनेमुळे शहरासह परिसरात खळबळ उडाली आहे,
याबाबत पोलीस सूत्रांनी ‘झेप न्यूज’ ला दिलेली माहिती अशी की, पुसद शहरातील विहार लॉजमधिल रुम नं.१०५ येथे नमूद घटनेच्या वेळी या ठिकाणी यातील आरोपीतांनी संगणमत करून टीचर आयोडीन, सोडियम, थायोसल्फेट, स्पिरिट कागद इत्यादी रसायनिक साहित्याचा वापर करून ५००/- रुपये दराच्या बनावट चलनी नोटा तयार करीत असल्याची माहिती खबऱ्याद्वारे पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती त्यावरून पुसद शहर पोलिसांनी ही२१मे२०२६ रोजी राञी १२:१० ते१:३० वाजण्याच्या सुमारास कारवाई केली आहे. या प्रकरणात आरोपींकडून रासायनिक साहित्याचा (टिचर आयोडीन, सोडियम, थायोसल्फेट, स्पिरिट, कागद इत्यादी) वापर करून ५०० रुपयांच्या बनावट नोटा तयार करीत असतांना त्यांच्याकडून एकूण रु. २,००,८८० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून,या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अट केली असुन त्यामध्ये १) सुरेश किशन पेंद्राम वय ४० वर्ष रा. व्हि. बी. कॉलनी जन्नाराम ता. जन्नाराम जि. मंचेरीयाल (तेलंगाणा), २) अविनाश कुमार सुरेंदर मालराज वय ३७ वर्ष रा. २३-२२५. तिलकनगर, मंचेरीयाल जि. मंचेरीयल (तेलंगाणा) ३) व्यंकटेश किशन जंगली वय ३३ वर्ष रा. २-२५२, गांधीनगर जन्नाराम ता. जन्नाराम जि. मंचेरीयाल (तेलंगाणा), ४) सैय्यद साजीद सैय्यद खाजा वय ३५ वर्ष रा. २५-१४१. अशोक रोड, मंचेरीयाल जि. मंचेरीयाल (तेलंगाणा) ह.मु. व्दारा अब्दुल रईस मोहमद, ६-६४/२७/१ नासपूर, मंचेरीयाल जि. मंचेरीयाल(तेलंगणा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. हे चौघेही तेलंगणाचे रहिवासी आहेत. शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गोपाल चंद्रपाल इंद्राळे वय ३७ वर्षे यांनी फिर्यादीच्या जबानी रिपोर्टवरून पुसद शहर पोलीसांत अप क्रमांक ४०९/२६ कलम १७८, १८०, १८१, ३ (५) भान्यास गुन्हे दाखल करण्यात आला आहे.आता त्यांचे नेटवर्क किती राज्यांमध्ये पसरलेले आहे? त्यांच्याशी आणखी किती लोक जोडले आहेत याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.या घटनेबाबत अधिकचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं असुन या घटनेमुळे शहरासह परिसरात खळबळ उडाली आहे.



