इंदिरानगर परिसरात १० गोवंश जनावरांना जीवदान; पोलिसांची बेधडक कारवाई!

पुसद : कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या १० गोवंश जनावरांना पुसद शहरातील सर्व पोलीस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांनी संयुक्तरीत्या जीवदान दिले.शनिवारी (दि.२३) रात्रीच्या सुमारास सुरू झालेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.पुसद-माहुर रस्त्यावरील इंदिरानगर नगर येथील केजीएन नगरमध्ये एका घरात २ गाई ३ गोऱ्हे ५बैल ही गोवंश जातीचे जनावरे अत्यंत निदर्यतेने कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवली होती. याची किंमत अंदाजे२,६०,००० हजार एवढी असून या प्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुसाफिर खान मेहबूब खान वय ३५ वर्षे (रा. मस्तानी चौक गढी वार्ड ह. मु. केजीएन नगर इंदिरानगर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी ‘झेप न्यूज’ला दिलेली माहिती अशी की,पुसद शहर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या शासकीय सेवक पोउपनि नगीना शेख मॅडम यांनी फिर्याद देली की, दि.२३ मे२०२६ रोजी चे रात्री पुसद शहर पोलीसांना खात्रीलायक गोपनिय माहिती मिळाली की, कत्तलीच्या उद्देशाने काही गोवंश जातीच्या जनावरांना के.जी.एन.नगर इंदिरा नगर, परिसरातील निर्जन परिसरात, बांधावर, विनाचारा पाणी न देता बांधून ठेवलेले आहे. त्यावेळी पुसद पोलीस उपविभागातील या पुसद शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे, वसंत नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे, पुसद ग्रामिण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आशिष चौधरी, सपोनि प्रेमकुमार केदार, पोउपनि नगीना शेख मॅडम, पोउपनि संतोष खांडेकर व त्यांचे सोबत पोलीसांचा फौजफाटा घेऊन इंदिरानगर येथील केजीएन नगरच्या एका घरा जवळील परिसरातील घटनास्थळी पोहोचले व पाहणी केली असता खबऱ्यांकडुन मिळालेली गोपनीय माहीती ही खरी असून अशा निर्जन स्थळी, विनाचारापाणी शिवाय वेगवेगळ्या ठिकाणी बांधलेले १० नग गोवंश जनावरे मिळून आले. त्यामध्ये २ गायी, ३ गो-हे, ५ बैल अशा गोवंश जनावराचा समावेश आहे. या जनावरांची अंदाजे किंमत २,६०, ०००/- जवळपास असणार आहे. परंतु त्या जनावरांपैकी काही जनावरे त्याची स्वतःची असल्याचे त्यांनी सांगितले असता त्या इसमास त्याचे नाव गाव विचारले त्यावेळी त्यांने त्याचे नांव मुसब्बीरखान मेहबुब खान वय ३५ वर्षे रा. मस्तान चौक, गढी वार्ड,ह.मु.के.जी.एन.नगर इंदिरा नगर रोड, पुसद असे सांगितले परंतु ज्यावेळी गोवंश जनावराबाबत त्यास विचारणा केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने आरोपी मुसब्बीरखान मेहबुब खान वय ३५ वर्षे याला ताब्यात घेऊन त्यास पुसद पोलीस स्टेशनला आणून अप.क. ४१५/२०२६ महा. प्राणी संरक्षण अधि. सुधारीत २०१५ कलम – ५ (अ), ५ (ब), ९, सहकलम ११ (१) प्राण्यांना क्रुतेने वागविणे प्रतिबंध अधि. १९६० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.अधिकचा तपास पोउपनि संतोष खांडेकर हे करीत आहेत. सदरची कार्यवाही मा.जिल्हा पोलीस अधिक्षक कुमार चिंता साहेब, मा.अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, पुसद हनुमंत गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे, वसंतनगर पोस्टेचे पोनि दिनेश झांबरे, पुसद ग्रामिण पोस्टचे पोनि आशिष चौधरी साहेब, सपोनि प्रेमकुमार केदार, पोउपनि नगीना शेख, पोउपनि संतोष खांडेकर, पोहेका /१५६३ मनोज कदम, पोका / २०९० नितेश भालेराव, पोका / २५४५ अमित पाटील, पोकों / शेख मेहबुब पोका / शुध्दोधन भगत, पोकों आकाश बाभूळकर, पोका / सुनिल मदने, पोहेका ८३ जलाल, पोका / पंजाब दयाल, व आरसीपी पथक यांनी केलेली आहे.



