ईतर

पुसद येथे राजस्थान मंडळाच्या वतीने कोजागिरी महोत्सव२०२६मोठ्या उत्साहात संपन्न!

कपिल जैन यांच्या हास्य कार्यक्रमाने रंगली हास्य जञा!

पुसद : येथील राजस्थान मंडळ पुसद द्वारे अग्रवाल मंगल कार्यालय येथे ‘कोजागिरी महोत्सव २०२६’ संपन्न झाले. यावर्षीच्या कोजागिरी महोत्सवात वाह वाह क्या बात है ‘फेम’ कपिल जैन चे हास्य हंगामा कार्यक्रम जोरदार रंगले.

यावेळी उपस्थितानी हास्य कार्यक्रमाचा भरगोस आनंद घेतला. कार्यक्रमात समाजात शाळेय प्राविण्य प्राप्त विद्यार्थी, जिल्हास्तरीय प्राविण्य प्राप्त विद्यार्थी, युवक,प्रतिष्ठीत पद, पुरस्कार प्राप्त करणाऱ्याचा सन्मान चिन्ह , प्रशस्ती पञ देऊन सत्कार करण्यात आला.

सन्मान चिन्ह व प्रशस्ती पञ स्व.गिरधारीलालजी चंदनमलजी अग्रवाल यांचे स्मृती प्रित्यर्थ श्री.शैलेश गि. अग्रवाल यांचे तर्फे देण्यात आले.समाज बांधवानसाठी स्वरुची भोजन चे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मंचावर राजस्थान मंडळ चे अध्यक्ष विजय भांगडे,अग्रवाल मंडळ चे अध्यक्ष घनश्याम गजबी , माहेश्वरी समाज चे अध्यक्ष दिलीप इन्नाणी, राजस्थानी ब्राम्हण पंचायत चे अध्यक्ष नरेंन्द्र मानका , जांगिड समाज चे अध्यक्ष ओमप्रकाश जांगिड , राजस्थानी महीला मंडळ च्या अध्यक्षा सौ. नंदा तोष्णीवाल, मारवाडी युवा मंच चे रवी काबरा, कपील जैन, मंचावर उपस्थीत होते.

कार्यक्रमात राजस्थान मंडळ चे अध्यक्ष विजय भांगडे यांनी मनोगत व्यक्त केले तथा अध्यक्षीय भाषणात समाजाने एकजुटीने राहुन एकमेकांना सहकार्य करण्याचे आव्हान केले.कार्यक्रमाचे संचालन श्रीमती ज्योती अग्रवाल , सौ.अपर्णा सोनी , सौ.अँड.कोमल भांगडे यांनी केले.कार्यक्रमाच्या अंती आभार डॉ.सचिन कोठारी यांनी मानले.

कार्यक्रमाच्या शेवटी पंडीत ओमजी तिवारी यांनी विधीवत पुजाअर्चना करुन भगवान श्री राधाकृष्णची आरती करण्यात आली व दूध् प्रसाद चे वितरण करण्यात आले.

राजस्थान मंडल पुसद चे कोजागिरी महोत्सव यशस्वी करण्याकरीता संपुर्ण कार्यकारणी पदाधिकारी , सदस्य, सल्लागार समिती चे सदस्य यांनी सहकार्य केले.कार्यक्रमात राजस्थान समाज चे शेकडो समाज बांधव उपस्थीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close