ईतर

मापात पाप! कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची लूट तरीही बाजार समितीच्या वजन काट्यात तफावत नसल्याच्या वैधमापन अधिकाऱ्यांचा अवाहल!

पुसद :येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाटोडी यार्डमध्ये वजन काट्यात मापात पाप करून शेतकऱ्यांच्या घामावातून कमावलेल्या अन्नधान्याची लूट सुरू असल्याचे उघडकीस आले होते. येथील वजन काट्यात मोठ्या प्रमाणावर तफावत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती. त्यावेळी हा वजन काटा पोलीस अधिकाऱ्यांनी सील केला होता परंतु पुन्हा या वजन काट्याचे वैधमापन अधिकाऱ्यामार् तपासणी केली असता शेतकऱ्यांच्या तक्रारीत तथ्य आढळले नसल्याने वैधमापन अधिकाऱ्यांनी तो वजनकाट्याचे सिल पुन्हा खुले केले असून या वजन काट्यात कोणतीही तफावत नसल्याचा अहवाल दिला असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांनी माहिती दिली असली तरीही स्थानिक नेत्यांनी आणि संबंधित कृषी उत्पान्न बाजार समितीच्या प्रशासन व वैधमापन अधिकाऱ्यांनी संगनमत करून हा अहवाल सादर केल्याचा आरोप शेतकरी वर्गातून केला जात आहे. परंतु शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता आपला माल (अन्नधान्य) विक्रीसाठी आणावे असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शेख कौसर यांनी केला आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की,दि. १६ मे रोजी शनिवाराला पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाटोडी यार्ड मध्ये वजनकाट्यात मापात पाप करून शेतकऱ्यांच्या मालाची लूट सुरू असल्याचे उघडकीस आले होते. परंतु वजनकाट्यात फरक आल्यामुळे पोलिस प्रशासनाकडुन हा वजनकाटा सिल करण्यात आला त्यावेळी शेतकऱ्यांनी मापात पाप केल्याप्रकरणी तक्रार नोंदवली होती परंतु संबंधित प्रशासनाने या तक्रारीची दखल घेऊन या वजन काट्याची तपासणी वैधमापन अधिकाऱ्यामार्फत करण्यासाठी वजनकाट्याचे सिल काढुन तपासणी केली असता या वजन काट्यात कोणतीही तफावत नसल्याचा अहवाल वैधमापन शास्त्र काटा पडताळणी निरीक्षक यांनी दिल्यामुळे आता कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शेतकऱ्यांनी आपला माल कोणतीही शंका-कुशंका न बाळगता बाजार समितीत विक्रीसाठी आणावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शेख कौसर व सचिव शिवाजीराव मगर यांच्यासह संचालक मंडळाच्या वतीने केले आहे. या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दि,१६मे२०२६ रोज शनिवारला तांत्रिक कारणामुळे वजन काट्यात फरक आल्यामुळे पोलिस प्रशासनाकडुन सदरचा वजन काटा सिल करण्यात आला होता. त्यानंतर दि. १७ मे२०२६ रोज रविवारला कृषी उत्पन्न बाजार समितीने ग्रामिण पोलिस स्टेशन पुसदचे पोलिस उपनिरीक्षक कैलास व्ही. ससाने व पोलिस शिपाई तसेच वैधमापन शास्त्र (काटा पडताळणी) निरीक्षक व त्यांचे कर्मचारी आणि दोन पंचांचे उपस्थितीत व्हिडीयो शुटींग व्दारे वजन काट्याचे सिल काढुन तपासणी केली असता या तपासणी दरम्यान बाजार समितीच्या वजन काट्यामध्ये कोणताही दोष आढळलेला नाही असा लेखी अहवाल निरीक्षक वैधमापन शास्त्र (काटा पडताळणी) यांनी दिलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांशचा संभ्रम दूर करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने हा वजन काटा प्रमाणीत करून घेतला असुन या मध्ये कोणतेही तफावत नसल्याचा अहवाल वैधमापन शास्त्र (काटा पडताळणी) निरीक्षक यांनी दिल्यामुळे बाजार समितीचे कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना कळविण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल निःसंकोच बाजार समितीचे यार्डात विक्रीस आणावा आणि कोणत्याही अफवावर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन सभापती, शेख कौसर यांनी केले आहे परंतु या आव्हानावर शेतकरी मात्र विश्वास ठेवण्यास आजही तयार नाही आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने वैध मापन अधिकार्‍यासोबत संगणमत करून आपला काळाबाजार लपविण्यासाठी हा अहवाल घेतला की काय.? असा शेतकरी प्रश्न विचारत आहेत. जर हा वजन काटा सदोष होता तर ज्या शेतकऱ्यांनी आज पर्यंत विक्रीसाठी आणलेल्या मालाची चौकशी झाली कां किंवा केवळ या वजन काट्यात तफावत निर्माण झाली तर शेतकऱ्याची नुकसान भरून कोण देणार आणि संबंधित प्रशासनावर काय कारवाई केली असे अनेक प्रश्न शेतकरी विचारू लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close