पुसद नगरपरिषदेचा कारभार म्हणजे अंधेरी नगरी चौपट राजा; शहरात लाखो रुपये खर्चून बसविलेल्या एलईडी टिव्ही बनल्या शोभेच्या वस्तू!

पुसद : नगरपरिषदेचा कारभार म्हणजे अंधेरी नगरी चौपट राजा असाच सध्या पाहावयास मिळत आहे.शासनाच्या शहर स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.० अंतर्गत शिक्षण संवाद (iec) आणि वर्तमानातील बदल(Bcc)च्या कामासाठी आलेल्या निधीतून पुसद नगर परिषदेच्या कारभाऱ्याने नगर परीषदेच्या हद्दीत काही चौकामध्ये संबंधित कंत्राटदाराला हाताशी धरून लाखो रुपये खर्चून बसविलेले एलईडी टीव्ही (LED TV) सध्या केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.० (नागरी) अंतर्गत माहिती, शिक्षण आणि संवाद (IEC – Information, Education and Communication) आणि वर्तणुकीतील बदल (BCC – Behavior Change Communication) या घटकांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाला होता.
जनजागृती, भिंतींवरील चित्रे, पथनाट्ये, जाहिराती आणि कचरा व्यवस्थापनाबाबत नागरिकांचे प्रबोधन करणे हा या कामांचा मुख्य उद्देश होता मात्र, पुसद नगर परिषदेने फक्त १७ दिवस एका चार चाकी वाहनावर जाहिरात केल्याचे “जिओ टॅग’ चे फोटो तयार करून या कामांमध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करून हा अनियमिता केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
केवळ एका चार चाकी वाहनावरील १७ दिवसाच्या जाहिरातीसाठी जवळपास अंदाजे खर्च २३लाख८००० हजार रुपये तर एलईडी टीव्हीच्या खरेदीसाठी अंदाजे ५लाख५०हजार रुपये असा एकूण २७लाख ८६ हजार ९०० रुपयांच्या निधी संबंधित कंत्राटदारावर मुक्तपणे उधळण केल्याचे उघडकीस आले आहे.
त्यामुळे संबंधित प्रशासनाने या शासनाच्या निधीतून लाखो रुपयांचा खर्चून संबंधित कंत्राटदारा मार्फत शहरातील चार मुख्य चौकात हे डिजिटल फलक किंवा एलईडी टीव्ही बसविले आहेत मात्र, एलईडी टीव्ही बसविले तेव्हापासून आजपर्यंत एलईडी टीव्हीची योग्य देखभाल आणि नियोजनाच्या अभावामुळे हे टीव्ही सध्या धूळ खात बंद अवस्थेत पडलेले पाहायला मिळत आहेत.त्यामुळे नागरिकांच्या करा मधून गोळा झालेल्या लाखो रुपयांच्या निधीचा वापर करून हे टीव्ही बसविण्यात आले, परंतु सध्या ते बंद असल्याने हा पैसा वाया गेल्याची भावना जनतेत असल्याने पुसद शहरात संबंधित प्रशासनाविरुद्ध नागरिकांमध्ये संताप पहावयास मिळत आहेत. म्हणूनच म्हणावे लागत आहे की, पुसद नगरपरिषदेचा कारभार म्हणजे अंधेरी नगरी चौपट राजा असाच कारभार सध्या नगर परिषदेमध्ये पाहावयास मिळत आहे.



