ईतर
डॉ.सौरभ भांगडे महाराष्ट्रातून द्वितिय क्रमांक;पुसद शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा!

पुसद : शहरातील सुपरिचित आणि नामांकित बालरोग तज्ज्ञ डॉ.संजय भांगडे यांचे सुपुत्र डॉ. सौरभ संजय भांगडे यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या मास्टर डिग्री मध्ये मास्टर सर्जन अस्तिरोग तज्ञ या विषयामध्ये महाराष्ट्रातून द्वितिय क्रमांक प्राप्त करून पुसद शहराचे नांव लौकीक केले आहे. डॉ. सौरभ यांनी एम.बि.बि.एस पदवी के. ई. एम. हॉस्पीटल येथुन करून उच्च पदवी अभ्यासक्रम पोस्ट ग्रँज्यूएट नायर हॉस्पीटल मुंबई येथून पुर्ण केले. डॉ. सौरभ भांगडे हे निट परिक्षेत सुध्दा यवतमाळ जिल्हयातून प्रथम क्रमांक प्राप्त केला होता हे विषेश.आपल्या यशाचे श्रेय वडील पुसद येथील प्रसिद्ध बाल रोग तज्ञ डॉ. संजय भांगडे आई सौ. राजश्री भांगडे व परिवारातील सदस्य तसेच शिक्षक,प्राध्यापक वृदांना दिला. या यशाबद्दल डॉ. सौरभ चे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



