पुसद शहर पोलीसांनी महिला पत्रकाराची तक्रार न घेता ताटकळत ठेवल्याने त्या पोलिसांच्या विरोधात उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल!

पुसद: शहरातील एका सोन सोनं विकणाऱ्या दुकानदारांनी एका महिला पत्रकारास दुचाकी पार्किंग करण्याच्या किरकोळ वादावरून शिवीगाळ करून त्या पत्रकारास अपमान जनक वागणूक दिल्याप्रकरणी त्या महिलेने त्या दुकानदाराविरुद्ध शेर पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेली असता शहर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेता जाणीवपूर्वक त्या महिलेस संबंधित दुकानदारासोबत बसून आपसात भानगड मिटवण्याचा सल्ला दिला त्यावेळी सदर महिलेने माझी तक्रार नोंद घ्या अशी पोलीस सकाळी विनंती केली परंतु संबंधित पोलिसांनी त्या महिलेची तक्रार नोंदवून घेण्यास उलट टाळाटाळ करत त्या महिलेला पोलीस स्टेशनला ताटकळत बसून ठेवल्याचा आरोप संबंधित महिलेने शहर पोलीस और केला असून यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद यांच्याकडे तक्रार दाखल केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित पोलिसासह त्या महिलेची शिवीगाळ करणाऱ्या आरोपीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी, पुसद शहरातील महिला पत्रकार रेश्मा लोखंडे (शिंदे) यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद यांच्याकडे दि,२९ ऑक्टोंबर २०२६ रोजी तक्रार दाखल केली की, दि.२८ ऑक्टोंबर रोजी पुसद शहरातील सोनार लाईन या दुकानासमोर दुचाकी पार्क करण्यावरून महाराजा ज्वेलर्सचे मालक ओंकार रेवनवार यांच्या सोबत किरकोळ वाद झाला या वादातून अपमानजनक शिवगड केल्याचा त्या महिला पत्रकाराने आरोप केला त्यावेळी त्या महिलेने शहर पोलीस स्टेशन गाठून रितसर तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता, ठाणेदार क्षीरसागर आणि पोलीस कर्मचारी शेख वसीम शेख कयूम यांनी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली आणि उलट हे संबंधित तक्रारदारांसोबत बसून बाहेरच्या बाहेर मिटवा अशी सुचविले परंतु संबंधित महिलेने माझी तक्रार घ्या असा हट्ट धरला तरीही पोलिसांनी त्या महिलेस अपमान जनक वागणूक देऊन पोलीस स्टेशनमध्ये तात्काळत बसून ठेवले त्यामुळे ती महिला दुसऱ्या दिवशी सुद्धा माझ्या तक्रार का नोंदवून घेत नाही याबाबत जब विचारण्यास गेली तरीही त्या महिलेची तक्रार घेण्यास शहर पोलीस ठाणे स्पष्ट नकार दिलाने त्या महिला पत्रकारांनी अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे दालन गाठून त्यांच्याकडे सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तक्रार न दाखल करून घेतल्या बाबत कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे अन्यथा नाईलाज असतो गृहमंत्र्याकडे तक्रार दाखल करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.



