गुप्तधनातील’सोन्याची नाणे कमी कीमतीत या आमिषातुन बनावट पोलिसाचा ट्रॅप फीर्यादीची ११लाखाने फसवणूक; स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकांकडून गुन्हा उघड!

पुसद: महागाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत धक्कादायक घटना समोर आली आहे. गडचिरोली येथील एका व्यक्तीस सात ते आठ लोकांनी गुप्तधनातील सोन्याची नाणी कमी किमतीत देतो असे आमिष दाखवून दहीसावळी परिसरात बोलाविले त्यावेळी आरोपी व फिर्यादी बोलत असताना त्या ठिकाणी अचानक पोलीस आल्याचे पाहून फिर्यादी व आरोपी घाबरून पळकाढित असताना बनावट पोलिसांनी व त्याच्या साथीदारांनी ट्रॅप रचलाा आणि त्यांच्याकडील १० लाख ८० हजार रुपये ताब्यात घेऊन पसार झाले त्यावेळी फिर्यादीची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ महागाव पोलीस स्टेशन गाठले आणि अज्ञात आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली त्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असता स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने गुन्हा कबूल केला असून आरोपी विठठल पांडुरंग पवार वय ३४ वर्ष, रा. पिंपळगांव ता. पुसद जि. यवतमाळ असे अटक केली आहे. 
याबाबत पोलीस सूत्राने ‘झेप न्यूज’ ला दिलेली माहिती अशी की, महागांव पोलीस स्टेशन हद्दीत कमी किंमत सोने विक्रीची अमिष दाखवून व आरोपी पैकी काही आरोपी पोलीस असल्याचा बनाव करुन १०लाख८०हजार रुपये फसवणुकीच्या गुन्ह्यातील अनोळखी आरोपी निष्पन्न करुन गुन्हा उघडकीस गुन्हयातील फसवणुकीतील फिर्यादी संदीप रामचंद्र खोब्रागडे वय३४ वर्ष रा. गोकुळ नगर बायपास आय टी आय चौक गडविरोली यास अनोळखी इसमाने संगणमत करुन कमी किंमती मध्ये गुप्तधन देतो असे सांगून फिर्यादीचे रोख रक्कम १०ला८०हिजर रुपये फसवणूक केली म्हणून फिर्यादी यांनी दि. २मे२०२६ रोजी रोजी पोलीस स्टेशन महागांव येथे दिलेल्या फिर्यादी वरुन अज्ञात आरोपी यांच्या विरुध्द अप २१६/२०२६ कलम ३१८ (४), ३(५) भान्यास अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी पोलीस निरीक्षक सा स्थागुशा यवतमाळ यांना सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपी बाबत गोपनिय माहीती काढून आरोपी शोध घेवून गुन्हा उघडकीस आणन्या करीता आदेशित केले होते. त्यासाठी स्थागुशा कॅम्प पुसद कडील अधिकारी व अंमलदार यांच्या पथकांने गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून बारकाईने पाहणी केली. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपी बाबत गोपनिय माहीती काढत असतांना नमूद पथकांला सदरचा गुन्हा पिंपळगांव येथील विठठल पांडुरंग पवार व त्याचे इतर साथीदार यांनी केला असल्याबाबत माहीती मिळाल्याने आरोपी विठठल पांडुरंग पवार यांचा शोध घेत असतांना तो पिंपळगांव येथे असल्याबाबत माहीती मिळाल्याने नमूद पथक पिंपळगाव येथे जावून संशयीत इसम विठठल पांडुरंग पवार रा. पिंपळगाव ता. पुसद जि. यवतमाळ यास अतिशय शिताफिने पोलीस कौशल्याचा वापर करुन ताब्यात घेवून गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपूस केली असता सर्व प्रथम उडवा-उडवीचे उत्तरे देत असल्याने त्यास अधिक विश्वासात घेवून अतिशय चिकाटीने गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने व त्याचे इतर ७ साथीदार असे आपआपसांत संगणमत फिर्यादी यास गुप्तधन सोन्याचे नाने देतो असे सांगून त्यास महागांव हद्दीमध्ये दहीसावली येथे रोडवर बोलावून त्याचेकडील१०लाख८०हाजार रुपये ताब्यात घेवून नमूद आरोपी यांनी फिर्यादी यांची फसवणुक करण्याच्या उद्देशाने बनावट पोलीस तयार करुन त्यांना बोलावून फिर्यादी हा बनावट पोलीस आल्याचे पाहून घाबरुन तेथून पळून गेल्याने फिर्यादीची १०लाख८०हाजार रुपये आरोपी व त्याचे साथीदार घेवून गेलो असे सांगून गुन्हा केल्याचे कबूल केल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आणून नमूद आरोपी विठठल पांडुरंग पवार वय ३४ वर्ष, रा. पिंपळगांव ता. पुसद जि. यवतमाळ यांच्याकडून गुन्ह्यातील फसवणुक केलेल्या रक्कमे पैकी २लाख ५०हजार/- रोख रक्कम जप्त करुन महागांव पोलीस स्टेशन अप क्रमांक अप क्रमांक २१६/२०२६ कलम ३१८ (४), ३ (५) भान्यास या गुन्हयातील आरोपी निष्पनन करुन गुन्हा उघडकीस आणून आरोपी १) विठठल पांडुरंग पवार वय ३४ वर्ष, रा. पिंपळगांव ता. पुसद जि. यवतमाळ यास पुढील तपास कामी पोलीस स्टेशन महागांव यांच्या ताब्यात दिले,सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता (भा. पो. से) सा, मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात (म.पो. से) सा. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड हनुमंत गायकवाड सा तसेच मा. पोलीस निरीक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, मा. पोलीस निरीक्षक धनराज निळे पोलीस स्टेशन महागांव यांच े मार्गदर्शनात सपोनि धिरज बांडे, पोउपनि शरद लोहकरे, सफौ/ मुन्ना आडे, पोहवा संतोष भोरगे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि/ सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, पोशि राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.



