विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूलमध्ये अत्याधुनिक “पोदार स्पोर्ट्स झोन” चे उत्साहात उद्घाटन!

पुसद : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबत क्रीडेलाही समान महत्त्व देणाऱ्या विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूल, पुसद येथे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुरुवार दिनांक 14 मे २६ रोजी संस्थेच्या डायरेक्टर्सच्या मातोश्री सौ. शंकुतला अप्पाराव मैंद, ,सौ. शोभा अनिलराव डूबेवार, श्रीमती विमल गोपालदास अग्रवाल, श्रीमती माधुरी मनोहरराव अनंतवार तसेच श्रीमती शंकुतला शंकरराव सोमावार व श्री अनिल डुबेवार यांच्या शुभ हस्ते अत्याधुनिक “पोदार स्पोर्ट्स झोन” चे उद्घाटन नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. या भव्य स्पोर्ट्स झोनच्या उद्घाटनामुळे विद्यार्थ्यांसह पालक आणि क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुमारे ३०,००० चौ.फुट क्षेत्रात उभारण्यात आलेल्या या स्पोर्ट्स झोनमध्ये क्रिकेट, फुटबॉल,व्हॉलीबॉल, पिकल बॉल, किड्स प्ले एरिया तसेच विविध मैदानी खेळांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञान व सुरक्षिततेच्या दृष्टीने डिझाइन करण्यात आलेल्या या क्रीडा संकुलामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण व सरावाची संधी उपलब्ध होणार आहे.
उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी क्रीडांगणांचे महत्त्व अधोरेखित केले. *“ज्ञान, संस्कार आणि क्रीडा यांचा संगम”* ही संकल्पना प्रत्यक्षात साकारत विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूलने पुसद शहरात आधुनिक क्रीडा सुविधांची नवी ओळख निर्माण केली असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले. या स्पोर्ट्स झोनच्या रूपाने पुसदच्या वैभवात एक मानाचा तुरा रोवला आहे.
उद्घाटन प्रसंगी आर्किटेक्चर श्री साई डुबेवार यांच्यावतीने त्यांचे काका श्री व सौ सुनील डुबेवार तसेच स्पोर्ट्स झोनच्या उभारणीसाठी सहकार्य करणाऱ्या डीजे अरेनाचे संचालक श्री देव विजय जाधव यांच्यावतीने त्यांचे पालक श्री व सौ विजय जाधव, सचिव युवक मंडळ पुसद यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाला पालक, विद्यार्थी, नागरिक व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन संस्थेचे संचालक शरद मैंद, सुरज डुबेवार, संतोष अग्रवाल, मनिष अनंतवार आणि संगमनाथ सोमावार तसेच प्राचार्या डी राधा, एडमिन ऑफिसर गोविंद निमडगे, सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी यशस्वीरीत्या पार पाडले.



