पुसद तालुक्यातील पारध येथे २ लाख ७२ हजार ४४० रूपयाचा गांजा जप्त; ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना!

पुसद : तालुक्यातील पारध येथे एका इसामाच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा असल्याची गोपनीय माहिती सूत्रांकडून ग्रामीण पोलिसांना मिळाली.त्या माहितीच्या आधारे पुसद ग्रामीण पोलिसानी दि.४ डिसेंबर २०२३ रोजीच्या रात्रीच्या दरम्यान धाड टाकली.असून त्यामध्ये २ लाख ७२ हजार ४४० रुपयाचा गांजा जप्त केला असून .सोबतच एका आरोपीला ताब्यात देखील घेतले आहे .रमेश शिवराम जाधव वय वर्ष ५५ रा.पारध यांच्या घरातून गांजा जप्त केला असुन त्याला अटक करून त्याच्या विरोधात विविध कलमान्वये पुसद ग्रामीण पोलीस टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .प्राप्त माहितीनुसार रमेश जाधव याच्या घरात मोठ्या प्रमाणात गांजा असल्याची गोपनीय माहिती खबऱ्याकडून ग्रामीण पोलीसांना मिळाली होती.त्या आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी पुसद पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनात पुसद ग्रामीण पोलिसांनी मोठ्या शिताफिने पारध येथील जाधव यांच्या घरी रात्री धाड टाकून मोठी कारवाई करण्यात आली आहे.या कार्यवाही मध्ये तबल २ लाख ७२हजार ४४०रुपयांचा १३ किलो गांजा जप्त करून रमेश जाधव यांना अटक करून विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी पंकज आतुलकर यांच्या मार्गदर्शनात पुसद ग्रामीण पोलीस टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश राठोड,पवन भांबुरकर,जब्बार शेख, प्रसेनजीत भवरे,बालाजी शेंगेंपल्लू यांनी व त्यांच्या टीमने रात्री उशिरापर्यंत कारवाई केली आहे.



