विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूल मध्ये दोन दिवसीय स्नेहसंमेलन संपन्न!

पुसद :परिसरात शैक्षणिक क्षेत्रात अमुलाग्र क्रांती घडवून आणणाऱ्या विद्यालंकार्स पोदार लर्ण स्कूल चे दोन दिवसीय अप्रतिम स्नेहसंमेलन मोठ्या थाटात संपन्न झाले.
स्नेहसंमेलनाच्या पहिल्या दिवशी उद्घाटनिय कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून नगरपरिषद पुसदचे मुख्याधिकारी अभिजीत वायकोस, कोषटवार विद्यालयाचे संचालक डॉक्टर आनंद मुखरे, पोदार स्कूल अमरावतीचे प्राचार्य तथा विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूलचे मेंटॉर् प्रिन्सिपल सुधीर महाजन सर, २०२३-२४मध्ये विद्यालयात प्रथम प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पाच पालक तसेच दुसऱ्या दिवशी उद्घाटनीय कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर व डॉक्टर सतपाल सोवळे विदर्भ को-ऑर्डिनेटर,भारतीय विचार मंच यांचे सह दोन्ही दिवशी संस्थेचे अध्यक्ष शरद मैद, सचिव श्री सुरज डुबेवार, उपाध्यक्ष श्री संतोष अग्रवाल, कोषाध्यक्ष श्री मनिष अनंतवार, सहसचिव श्री संगमनाथ सोमावार, प्राचार्य सौ अनुपमा भट देशमुख, उपप्राचार्य सौ प्रतिमा जाधव, मुख्याध्यापिका श्रीमती विजया त्रिपाठी आणि शाळेचे ऍडमिन ऑफिसर श्री गोविंद निमडगे हे उपस्थित होते. 
पंचकोशा व रघुवंशम या दोन विषयांवर दोन दिवसीय स्नेहसंमेलनाचे सादरीकरण करण्यात आले. डॉक्टर आनंद मुखरे, अभिजीत वायकोस, सुधीर महाजन सर यांनी शाळेत वेळोवेळी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचे व विद्यार्थ्यांच्या कृतीयुक्त सहभागाबद्दल संस्थेचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये *अन्नमयकोश, प्राणमय कोश, मनोमयकोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमयकोश* या पाच कोशांचे फार महत्त्व असते हे डोळ्यासमोर ठेवूनच तयार करण्यात आलेल्या प्री प्रायमरी चा अभ्यासक्रमाची आता नव्याने रचना करून पोदार जम्बो किड्स आता पोदार प्रेप या नावाने सुरू होत असल्याचे श्रीमती त्रिपाठी यांनी सांगितले.त्या म्हणाल्या आम्ही समजतो की पंचकोश हा वेगळा नसून एकमेकांशी जोडलेला आहे शाळेतील अनेक उपक्रमामध्ये आम्ही त्यांना एकत्र करतो, नोबेल गिफ्टसह कोडींग नावाची एक क्रिया आहे ज्यामध्ये आम्ही सर्व पंचकोश घटक मिसळतो आणि आमच्या चिमुकल्यांचा शारीरिक, सामाजिक, भावनिक, नैतिक, संज्ञानात्मक कौशल्य विकास आणि सौंदर्य व सांस्कृतिक विकास कसा होतो याची सांगड घालून दैनंदिन अध्यापन केल्या जाते हेच या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून दाखविण्यात आले. चिमुकल्यांचे सादरीकरण पाहून पालकांची मने भरून आली होते.
दुसऱ्या दिवशी *रघुवंशम* हा विषय घेऊन इयत्ता चौथी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी रामायणावर आधारित अतिशय उत्कृष्ट नृत्य नाटिका सादर केली. यामध्ये रामजन्मापासून हे रावण वधापर्यंतचे सर्व प्रसंग हुबे-हूब विद्यार्थ्यांनी उभे केले आणि संपूर्ण परिसर राममय झाला. अतिशय भक्तिमय वातावरणात स्नेहसंमेलन साजरे झाले. स्नेहसंमेलनाची अशी ही एक थीम असू शकते आणि त्याचे एवढ्या उत्कृष्ट् रित्या सादरीकरण होऊ शकते हे शाळेने दाखवून दिले, याबद्दल पालकांमध्ये समाधान व्यक्त होत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष शरद मैद यांनी तर आभार कोषाध्यक्ष मनिष अनंतवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी पालक, परिसरातील निमंत्रित बंधू-भगिनी, पत्रकार बंधू भगिनी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील संपूर्ण शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.



