खोटे लग्न लावून देवुन आर्थिक फसवणूक करणारा फरार मोरक्या अखेर गजाआड!
लुटेरी दुल्हन’ : लाखो ची फसवणूक करणाऱ्या टोळीचा शहर पोलिसांनी केला पर्दाफाश!

पुसद : शहरातील उपवर तरुणाला हेरून मध्यस्थीमार्फत खोटे-नाटे लग्न लावून दिलं त्यानंतर व बनावट नवरी नवरी सोने नाणे दोन लाखाची रोकड रक्कम घेऊन सर्व प्रसार झाल्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघडकीस आला होता या प्रकरणात उपवर तरुणाची फसवणूक झाली असून त्याला सोने नान्यासह दोन लाखाचा लाखोचा गंडा घालणाऱ्या विरुद्ध शहर पोलीस स्टेशन पुसद येथे तक्रार दाखल केली होती परंतु तोपर्यंत आरोपी प्रसार होण्यात यशस्वी झाले होते त्यामुळे शहर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असताना खोटे- नाटे लग्न लावून देवुन आर्थिक फसवणूक करणारा फरार मोरक्याला पोलिसांनी अखेर गजाआड केले आहे.
याबाबत शहर पोलीसांनी ‘झेप न्यूज’ ला दिलेली माहिती अशी की, दि. १२जानेवारी२०२६ रोजी फिर्यादी नामे शुभम अरुणराव कावळे रा. पुसद यांनी फिर्याद दाखल केली होती की,आरोपी क्र.१) सुनेना हेमंत कुरील रा. बोथा जि. परभणी हीने तीचे तीन साथीदारासह लग्न करण्याचे ठरवुन फिर्यादी कडुन दोन लाख रुपये घेऊन एक दिवसाचे बनावट लग्न केले व त्यांनतर अंगावरील सोन्या नाने घेऊन साथीदारासह संगणमत फसवणुक करुण पसार झाले असे पो. स्टे.ला दिलेल्या रीपोर्ट वरुण कलम ११६/२०२६ कलम ३१६ (२),३१८(४),३, (५) भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा नोंद करुण गुन्हयाचा तपास पोउपनि रमेश इंगळे करीत आहे.लग्न न होना-या मुलास टार्गेट करुण मुलीचे बायोडाटा पाठवुन संगणमत करुण नवरदेव मुलास पैस्याची मागणी करुण तसेच एक दिवसाचे खोटे नाटे लग्न लावुन देउन अंगावरील सोने नाने घेऊन पसार झालेल्या आरोपीस ठाणेदार सेवानंद वानखेडे पोलीस स्टेशन पुसद शहर यांनी डी.बी.पथक पुसद शहर यांना मार्गदर्शन करुण आरोपीस अटक करन्याचे आदेश त्यावरुण डी.बी. पथक आरोपी शोध घेणे कामी रवाना होवुन गोपनिय बातमीचे आधारे आरोपी ग्राम कासोळा येथे मंदिराचे बाजुला लपुन असल्याची माहीती मिळाली त्यावरुन डी.बी. पथक पुसद नी आरोपी नामे दिपक सटवाजी ठमके वय ५९ वर्ष रा. कासोळा ता. महागाव जि. यवतमाळ यास सापळा रचुना मोठ्या शिताफीने पकडुन त्यास अटक करन्यात दिले आली आहे.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक, कुमार चिंता, अप्पर पोलीस अधिक्षक, थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद हर्षवर्धन बि.जे. साहेब यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार सेवानंद वानखेडे यांचे सुचने प्रमाणे. हवा. मनोज कदम, पो, काँ, शुध्दोधन भगत, पो.कॉ. आकाश बाभुळकर, सचिन राउत, म.पो.कॉ. इंद पवार यांनी केली असुन पुढील तपास पोउपनि रमेश इंगळे करीत आहे. परंतु पुसद शहरातील व परिसरातील बिना लग्नाचं उपवर मुला- मुलींनी भावनेच्या भरात जावुन बनावट लग्न लावुन देवुन फसवणुक करुण लाखोचा गंडा घालणाऱ्या लोकांपासून सावध राहण्याचे आव्हान शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांनी केले आहे.



