ईतर

या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांचा घात झाला तर, शासनाला याची मोठी किंमत मोजावी लागेल – शेतकरी नेते मनीष जाधव स्वाभिमानी शेतकरी संघटना!

पुसद: यावर्षी एलनिनो च्या प्रभावामुळे पावसाने हुलकावणी दिल्याने यवतमाळ जिल्ह्यातील खरीप-२०२६च्या हंगामातील उभी पिके पावसाच खंड व मोठी तुट पडल्याने करपून गेली आर्थिक दृष्ट्या जिल्ह्यातील शेतकरी कोलमडून पडला राज्यभरातून शेतकऱ्यांनी व शेतकरी संघटनांनी विरोधी पक्ष नेत्यांसह या दुष्काळाच्या अनुषंगाने मदतीसाठी शासनाकडे रस्त्यावर उतरून आपला असंतोष व्यक्त केला.

व आर्त हाक दिली याची दखल घेत शासनाने कार्यतत्परतेने कोरडा दुष्काळ घोषित केला , मात्र दुष्काळ घोषित करून शासनाने पराक्रम केला नाही, तर शासन धोरणात करावंच लागणार होतं केवळ कागदावर पीक नुकसानीचे पंचनाम्याचे कागदी घोडे नाचवत बसण्यापेक्षा , शेतकऱ्यांना मदतीचे निकष लावताना प्रत्यक्ष शेत पातळीवरील उत्पादनावर येणाऱ्या खर्चाच्या आधारावर भरीव आर्थिक मदत या दुष्काळाच्या दृष्ट चक्रात आर्थिक विवेंचनेत होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा , अशी न्यायिक मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मनीष जाधव यांनी काल महागाव तालुक्यातील , बोरी इजारा व, वागद इजारा येथे कोरड्या दुष्काळाच्या पीक नुकसानीच्या पिक पंचनाम्याच्या वेळी पाहणी करताना दुष्काळी उपाय योजनांच्या शासन धोरणावर शेतकरी हितासाठी मत व्यक्त केले.

एकही शेतकरी पंचनामाच्या प्रशासकीय प्रक्रियेपासून कुठल्याही शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची प्रशासकीय अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, शेतकऱ्यांना सहकार्य करा असे पंचनामा प्रशासकीय अधिकारी यांना आवाहन शेतकरी नेते मनीष जाधव यांनी यावेळी केले पिक पंचनामे करत असताना शेतकऱ्यांकडून सर्व तांत्रिक माहिती अचूक घेण्याच्या ही सूचना त्यांनी केल्या या पीक पंचनामेच्या मोहिमेमध्ये महसूल विभागाचे तलाठी किरण राठोड, शितल काईट कृषी सहाय्यक, डाखोरे साहेब कृषी विभाग व महसूल विभागाचे धनवे साहेब यांच्यासह अन्य ग्रामविकास अधिकारी इर्शाद पठाण , दीपक पोरजवार स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा संघटक , नरेंद्र जाधव , सतीश पोरजवार ,विनोद राठोड, बाबू सिंग राठोड, अश्विन लोणकर, सुनील , गजानन गोदमले.

 पुसद तालुक्यातील काटखेडा या गावी पीक नुकसान पंचनामे करताना ग्रामविकास अधिकारी कुमारी टी.बी राठोड, कृषिषयक गजानन चव्हाण,ग्रामपंचायत कर्मचारी गोकुळ जाधव , पिंटू खिल्लारे, मनोहर रावजी राठोड, विकास दत्ता खिलारे, जयानंद मधुकर खिल्लारे. विश्वदीप झोडगे मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close