वळणावरील रस्त्यात उभ्या ट्रॅक्टरवर दुचाकी धडकल्याने भिषण अपघात ; युवकांचा जागीच मृत्यू!
खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेंबाळपिंपरी- पुसद मार्गावरील घटना!

पुसद: तालुक्यातील खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेंबाळपिंपरी पुसद मार्गावरील रस्त्यात विद्युत विभागाचे खंबे घेऊन उभा असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर पाठीमागून दुचाकी आदळल्याने झालेल्या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि.१० जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ७ ते७:३० वाजण्याच्या सुमारास घडली त्यामुळे शेंबाळपिंपरी परिसरातील पंचकोशीत शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवाजी देविदास पुलाते वय अंदाजे ३२वर्षे रा.पालमपट ता.पुसद जि.यवतमाळ, असे या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी मिळालेली माहिती अशी की, खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या पालमपट येथील शिवाजी देविदास पुलाते (वय ३२) हे दुचाकी ( क्रमांक एम एच २९सि एच पी एम ०४१० ) हा ईसापुर पालमपट येथे गावाकडे निघाला होता. त्यावेळी शेंबाळपिंपरी-पुसद रस्त्यावर मोरे यांच्या शेडसमोर डिझेल संपल्याने विद्युत विभागाचे खांब घेऊन एक ट्रॅक्टर उभे होते. त्यावेळी या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर पाठीमागून जाणाऱ्या दुचाकी स्वरास उभे ट्रॅक्टर न दिसल्याने अचानक दुचाकी धडकली. यात या दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाल्याने या घटनेची माहिती खंडाळा पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीयतपासणीसाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे हलवण्यात आला परंतु या अपघातात सामाजिक कार्यकर्ता असलेल्या युवकाचा जीव गमावल्याने शेंबाळपिपरी परिसरातील पंचकोशीमध्ये शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे अपघाताच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे गतिरोधक नसल्याने किंवा लाईट नसल्यामुळे पुन्हा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ लाईट व गतिरोधक बसविण्याची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात येत आहे.



