माणुसकीची भिंत’सोशल फॉउंडेशन पुसद चा स्तुत्य उपक्रम;वादळामुळे उघड्यावर आलेल्या कुटुंबाला आधार

पुसद :येथील अनमोल नगर (कवडीपूर) परिसरातील रहिवासी श्री. प्रेम श्रीराम टाक यांच्या कुटुंबियांवर नुकत्याच पुसद येथे झालेल्या भीषण वादळामुळे मोठे संकट ओढवले होते. दिनांक २३ जून २०२६ रोजी झालेल्या या नैसर्गिक आपत्ती मध्ये त्यांचे संपूर्ण घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले व संपूर्ण कुटुंब बेघर झाले. या अत्यंत कठीण प्रसंगात या कुटुंबाला पुन्हा उभे करण्यासाठी ‘माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन, पुसद’ ने पुढाकार घेऊन मदतीचा हात पुढे केला. 
संस्थेच्या माध्यमातून सोशल मीडियावर करण्यात आलेल्या जाहीर आवाहनाला प्रतिसाद देऊन अनेक दानशूर नागरिकांनी सढळ हाताने आर्थिक मदत केली. या मोहिमेतून अवघ्या काही दिवसांतच एकूण रु. ३१,४५५/- चा निधी गोळा झाला. जमा झालेल्या या संपूर्ण निधीतून टाक परिवारासाठी घर उभारणीचे आवश्यक साहित्य (लोखंडी टीन, लोखंडी अँगल, सिमेंट व फिटिंगचे सामान) खरेदी करण्यात आले. व हे सर्व साहित्य आज रविवार, दिनांक १२ जुलै २०२६ रोजी सकाळी ७:३० वाजता , श्रीरामपूर येथे संस्थेच्या सर्व सदस्यांच्याव दात्याच्या उपस्थितीत पीडित कुटुंबाला सुपूर्द करण्यात आले. या मदतीमुळे बेघर झालेल्या टाक परिवाराला पुन्हा आपल्या हक्काचे घर उभे करता येणार आहे. या संवेदनशील आणि माणुसकीच्या कार्यात मिशन ग्रीन बहु उद्देशीय संस्था, रुग्णमित्र फॉउंडेशन पुसद, गुरुदेव सेवा मंडळ व प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या आर्थिक योगदान देणाऱ्या सर्व आदरणीय दानशूर दात्यांचे तसेच सहकाऱ्यांचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. “गरजवंतांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा” हा संदेश पुसदकरांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यातून अधोरेखित केला आहे. *यावेळेस टाक परिवारातील सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले त्यांनी मदत करणाऱ्या सर्व दात्यांचे आभार मानले व आम्हाला दुसरी कुठलीही मदत आतापर्यंत भेटली नाही असे सांगितले*.व माणुसकीची भिंतने माणुसकी जपली असे उद्गार परिसरातील सर्व नागरिकांनी काढले व त्यानी मदत करणाऱ्या सर्व दात्यांचे आभार मानले या प्रसंगी सत्यपाल महाराज यांचे शिष्य पंकज पाल महाराज व मदत करणारे दाते,माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसद, मिशन ग्रीन बहुउद्देशीय संस्था,गजानन अरगुलवार,रुग्ण मित्र फाउंडेशन,निशांत देऊळकर,डॉ.अनुष्का तडकसे,प्रवीण गुंडेवार मुंबई,स्वाती वाट(दळवी),प्रशांत नागरे,साहेबराव देवसरकर, पद्मभूषण राजगुरू IAS/ACF, अनिल राठोड पोहरादेवी, प्रशांत शिवणकर,मंथनकदम,रूपाली नरडे,जया राठोड ,संदीप मानकर,विजय राठोड,साधना पौळ, अमित पातुरकर, प्रकाश लामने अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ,अंकित पटेल,प्रवीण चांडे, संगीता जाधव,अर्चना यादव,अमोल कांबळे,श्रीशा चव्हाण,सुशील जांबानी,दत्तराव पाईकराव,संतोष तिजारे, गौरव नाईक,श्रीमती मंजुषाताई डेकाटे,संतोष देशमुख क्रेशर मशीन, जयाजी तिजारे,अजय मानकर,अद्विक गिरगावकर,प्रवीण प्रकाश महाजन, व यावेळेस उपस्थित अरुण कांबळे, राजेश्वर आडे, विष्णू गायकवाड, पंकज पाल महाराज गजानन जाधव, अनंता चतुर ,मंगेश भगत ,पंजाब ढेकळे, संतोष गावंडे ,रमेश डंबोळे, शांतीसागर इंगोले ,नयन रामधनी, निखिल गादेवार, किरण किनाके ,पवन बोजेवार प्रमोद ठाकूर, धनंजय आघाम, व परिसरातील नागरिक उपस्थित होते.



