दंगल व खुनाच्या प्रकरणातील आरोपातून ॲड.अनिल ठाकूर १७ वर्षांनंतर निर्दोष मुक्त…
पुसद अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

पुसद: शहरात १७ वर्षापूर्वी म्हणजे सन २००९ साली रामनवमी उत्सवादरम्यान उसळलेल्या दंगल प्रकरणात आरोपीं ॲड.अनिल ठाकूर यांच्या विरोधात संबंधित तत्कालीन पोलिस प्रशासनाने व राजकीय व्यवस्थेने जाणीवपूर्वक राजकीय किंवा वैयक्तिक वैमनस्यातून केलेली खोटी तक्रारी दाखल करून अदखलपात्र गुन्ह्यां ऐवजी गंभीर स्वरूपाचे दखलपात्र गुन्हे दाखल केले होते त्या बहुचर्चित दंगल प्रकरणात १७ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर निकाल लागला असून पुसदच्या विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रिमती रामगडीया यांनी ॲड अनिल ठाकुर यांची या दंगल प्रकरणाच्या आरोपातून सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आली आहे.तर राजकीय दबावाखाली येऊन जाणूनबुजून खोटे पुरावे तयार करून किंवा खोट्या नोंदी केल्याबद्दल संबंधित पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणीसाठी हि लढाई लढणार असल्याची माहिती ॲड अनिल ठाकुर यांनी दि.१२जुलै २०२६रोजी शासकीय विश्रामगृह पुसद येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांना माहिती दिली आहे.
याबाबत पत्रकार परिषदेत ॲड.अनिल ठाकूर यांनी सांगितले की,पुसद शहरात सन २००९ साली श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्याची योजना होती आणि तसे शोभायात्रेचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते परंतु काही राजकीय शक्तीला किंवा राजकीय दलालांना हे आयोजन खूपच होते. त्यामुळे रामनवमीच्या भव्य शोभायात्रेने, प्रस्थापित राजकीयांचे धाबे दणाणले. राम जन्मोत्सव समितीच्या शोभायात्रेच्या प्रमुख व भाजपाचे पुसद येथील तत्कालीन तालुका अध्यक्ष अनिल ठाकूर यांना राजकीय जीवनातून हद्दपार करण्याच्या उद्देशाने, संबंधित पोलीस अधिकाऱ्याला हाताशी धरून राजकीय षडयंत्र रचून, अनपेक्षित घडलेल्या दंगल आणि खुनाच्या खोट्या आरोपाखाली अनिल ठाकूर यांना जाणीवपूर्वक अटक केली होती. ठाकूर यांना खोट्या प्रकरणात अटक करण्यात आल्याचे, उच्च न्यायालयासह अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात स्पष्ट झाले.या प्रकरणात तब्बल १७ वर्षानंतर पुसदच्या विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती रामगडीया यांनी अनिल ठाकूर यांना सर्व खोट्या आरोपांतून निर्दोष मुक्त केले आणि तत्कालीन ठाणेदार ज्ञानेश्वर सहदेवराव कडू यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने १ जुलै रोजी दिले, अशी माहिती आज १२ जुलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेत निर्दोष मुक्त झालेले ॲड. अनिल ठाकूर यांनी दिली. ३ एप्रिल २००९ रोजी पुसद शहरात रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेदरम्यान षडयंत्रातून दंगल पेटवली, दरम्यान दोन इसमांचे खून झाले, या संधीचा फायदा घेऊन प्रस्थापित राजकारणी मनोहर नाईकांनी, पुसद पोलीस स्टेशनचे तेंव्हाचे ठाणेदार ज्ञानेश्वर कडू यांनी जिल्ह्यातील तेव्हाचे उभारते नेतृत्व व भाजपाचे तत्कालीन तालुकाध्यक्ष अनिल ठाकूर यांना दंगल आणि खुनाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांना अटक केली. एमपीडीए सारखे तडीपारचे गुन्हे सुद्धा त्यांच्या विरोधात सुबुद्धीने दाखल केले होते. वास्तविक तक्रारीत, एफआयआर मध्ये, फिर्यादींच्या जबाबात किंवा अन्य कोणत्याही प्रकारात अनिल ठाकूर यांचे नाव नसतानाही, केवळ सुडबुद्धीने आणि त्यांचे राजकीय खच्चीकरण करण्याच्या उद्देशाने त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून साडेचार महिने तुरुंगात डांबले. त्यामुळे अनिल ठाकूर यांचे राजकीय, पारिवारिक, आर्थिक, सामाजिक व मानसिक तणाव अशा प्रकारचे प्रचंड नुकसान झाले. तत्कालीन मंत्री मनोहर नाईक व त्यांच्या समर्थकांनी पोलिसांना हाताशी धरून शहरात दंगल घडवून आणल्याचा व त्याचे खापर राजकीय द्वेषातून अनिल ठाकूर यांच्यावर खोटा आरोप केला होता. ज्ञानेश्वर कडू यांच्या माध्यमातून, अनिल ठाकुर यांच्यावर दंगलीपासून खुनापर्यंतचे (गुन्हे क्र. ५४/२००९, ६६/२००९, ७०/२००९) अनेक खोटे गुन्हे दाखल करण्यात आले व त्यांना प्रमुख आरोपी करण्यात आले होते. तपासातील त्रुटी आणि खोटे पुरावे तयार केल्याचे न्यायालयात उघड झाले.या प्रकरणात तत्कालीन ठाणेदार ज्ञानेश्वर कडू यांनी अधिकाराचा गैरवापर करून, बनावट कागदपत्रे व खोटे साक्षीदार उभे केल्याचेही न्यायालयात उघड झाले आहे. विशेष म्हणजे, यातील फिर्यादी पी. एस. आय. पुरुषोत्तम ईटनारे यांनी स्वतः न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून, “ठाणेदार ज्ञानेश्वर कडू यांच्या सांगण्यावरून आपण खोटी फिर्याद दिली, अशी कबुली न्यायालयात दिली. न्यायाधीश श्रीमती रामगडीया यांच्या न्यायालयात चाललेल्या या खटल्यात, तपासातील अनेक धक्कादायक त्रुटी समोर आल्या. घटनास्थळाचा खोटा पंचनामा, साक्षीदारांचे उशिरा घेतलेले जबाब, आणि दस्तऐवजांमधील खोडखाड न्यायालयात सिद्ध झाली. कडू यांनी सूडबुद्धीने कारवाई करून खोटे आरोपपत्र दाखल केल्याचे न्यायालयात स्पष्ट झाले, त्यामुळे ठाणेदार ज्ञानेश्वर कडू यांच्यावर कारवाईचे आदेश दिले. या खटल्यात अनिल ठाकूर यांची बाजू प्रसिद्ध एडवोकेट राजेश साबळे, स्वतः एड. अनिल ठाकूर, डॉ. अर्जुन ठाकूर, ऍड. रवी वाघमारे, ऍड. दिनेश राठोड यांनी मांडली. संपूर्ण तपासणी व तथ्यहीन खोटे दस्तावेज, एकंदरीत प्रकरण लक्षात घेऊन विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश रामगडिया मॅडम यांनी कडू यांच्याविरुद्ध खोटारडेपणाचा थपका ठेवत अनिल ठाकूर यांना खोट्या आरोपातून निर्दोष मुक्त केले. ठाणेदार कडू यांच्या विरोधात फौजदारीसह आवश्यक प्रकारची कारवाई लवकरच करण्यात येणार असल्याचे या पत्रकार परिषदेत अनिल ठाकूर यांनी सांगितले. यावेळी ऍड. दिनेश राठोड, एड. अर्जुन ठाकूर, ऍड रवि वाघमारे, संजय बयास, ललित चव्हाण, ऍड. अजित ठाकुर व सहकारी उपस्थित होते



